‘ठाकरेंनी लोकसभेचं खातं उघडून दाखवावं’, गिरीश महाजनांचं थेट चॅलेंज

आम्हाला 25 जागा पाहिजे आणि 30 जागा पाहिजे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी म्हटलं तुम्ही 30 घ्या 23 घ्या किंवा 3 घ्या. महाराष्ट्राच्या एकाच जागेवर लक्ष द्या आणि खाते उघडून दाखवा, असे आव्हान गिऱीश महाजन यांनी ठाकरेंना दिले आहे.

girish mahajan challenge uddhav thackeray one lok sabha seat should selected and shown maha vikas aghadi mahayuti

girish mahajan challenge uddhav thackeray one lok sabha seat should selected and shown maha vikas aghadi mahayuti

प्रशांत गोमाणे

• 06:43 AM • 15 Jan 2024

follow google news

Girish Mahajan challenge Uddhav Thackeray : आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाची बाजू कमकुवत झाली आहे, तर रविवारी मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला बसला आहे.एकंदरीत लोकसभा निवडणूकीआधी महाविकास आघाडीची ताकद कमी होताना, तर महायुतीची ताकद वाढताना दिसतेय. यातूनच आता भाजप नेते आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठं आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे गटाने लोकसभेची एकतरी जागा निवडून आणून दाखवावी असे आव्हान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. या आव्हानावर आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (girish mahajan challenge uddhav thackeray one lok sabha seat should selected and shown maha vikas aghadi mahayuti)

हे वाचलं का?

जळगावात रविवारी महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना गिरीश महाजन यांनी ठाकरेंना आव्हान दिले आहे. भाजपा आणि शिवसेना ही नैसर्गिक युती असून राष्ट्रवादी सोबत आल्याने राज्यातील विकासकामांना वेग आला आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे हे एकच आपलं लक्ष्य आहे. लोकसभेसाठी आपण 405 चा नारा दिला आहे. उद्धव ठाकरे गटाने एकतरी जागा निवडून आणून दाखवावी असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘सगेसोयरे’ शब्द आणि 4 मागण्या, जरांगे-बच्चू कडूंमध्ये काय झाली चर्चा?

उद्धव ठाकरे यांच्या गटाने महाराष्ट्रातील एक जागा निवडून दाखवावी. फक्त एक… तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टी करता.. सकाळी उठल्यापासून जो लाऊडस्पीकर सुरू करता, जे तोंडसुख घेता, वाटेल ते बोलतायत, टीकाटीपण्णी करतायत. आता जागेसाठी भांडतायत. आम्हाला 25 जागा पाहिजे आणि 30 जागा पाहिजे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी म्हटलं तुम्ही 30 घ्या 23 घ्या किंवा 3 घ्या. महाराष्ट्राच्या एकाच जागेवर लक्ष द्या आणि खाते उघडून दाखवा, असे आव्हान गिऱीश महाजन यांनी ठाकरेंना दिले आहे.

तुम्हाला माहितीय मी एकदा सांगितले की सांगितले. मी शब्द दिला की दिला तो खाली सहसा पडत नाही. मतदार हुशार झाले आहेत, त्यांना माहितीय कुणाला पाडायचंय आणि कुणाला निवडून आणून दिले पाहिजे. त्यामुळे आपलं लक्ष्य एकच आहे आपल्याला पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचे आहे, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

    follow whatsapp