‘शरद पवारांचे दोन नेते आमच्याकडे येणार’, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी असा दावा केला आहे की, शरद पवार यांच्या गटातील आणखी एक आमदार आणि एक खासदार लवकरच आमच्यासोबत येणार आहे.

One MP And One MLA will joined Ajit Pawar faction said Girish mahajan.

One MP And One MLA will joined Ajit Pawar faction said Girish mahajan.

भागवत हिरेकर

24 Sep 2023 (अपडेटेड: 24 Sep 2023, 01:22 PM)

follow google news

-मनीष जोग, जळगाव

हे वाचलं का?

Girish Mahajan : शरद पवार यांच्या गटात असलेला एक खासदार आणि एक आमदार लवकरच आमच्याकडे येणार आहेत, असा मोठा दावा भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला.

अजित पवारांसाठी दरवाजे बंद झालेत, असं शरद पवारांनी म्हटलं आहे, असा मुद्दा पत्रकारांनी गिरीश महाजनांसमोर उपस्थित केला. त्यावर महाजन म्हणाले की, “ते कुठे म्हणताहेत की, उघडा. आता तुमचे (शरद पवार) दरवाजे बंद ठेवा. जे तुमचे आत आहेत, ते इकडे यायला लागले आहेत. एक खासदार, एक आमदार पुन्हा आमच्याकडे येणार आहेत”, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.

हेही वाचा >> NCP: अजित पवार गटानं ‘या’ चार आमदारांची नाव का वगळली?

“मला असं वाटतं की, शरद पवारांनी त्यांचे दरवाजे बंद ठेवावेत. त्यांच्याकडे जे चार-पाच लोक राहिलेत शिल्लक ते सुद्धा इकडे पळून येताहेत”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

शरद पवार-गौतम अदाणी भेट; महाजन म्हणाले, एकदा ठरवा

एकीकडे राहुल गांधी गौतम अदाणींवरून मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे शरद पवारांनी गौतम अदाणींची भेट घेतली. यावरून गिरीश महाजनांनी इंडिया आघाडीला लक्ष्य केले. महाजन म्हणाले, “मला वाटतं त्यांनी एकमत करावं. इंडिया आघाडी मध्ये त्यांच्या नेताच ठरत नाहीये. नेता ठरला तर जसे घोडे पळतात, तसे हे चारही बाजूला पळतील.”

हेही वाचा >> सुप्रीम कोर्टानं वापरलेले ‘हे’ दोन शब्द… अन् CM शिंदेंचं भवितव्य

“अदाणींच्या बाबतीत त्यांनी एकमत करावं. आता काँग्रेसच शरद पवारांवर टीका करायला लागली आहे. वडेट्टीवार वाटेल तसं बोलायला लागले आहेत. सगळेच त्यांचे नेते बोलताहेत. मला वाटतं की, ही थोड्या वेळापुरती ही सर्कस आहे. फार वेळ हे चालणार नाही. त्यांची आयडॉलॉजी, विचार एक नाहीत. त्यांचा नेता ठर नाहीये. 2024 मध्ये भाजप आणि मित्रपक्षाचे खासदार मोठ्या संख्येने निवडून येतील. मोदीजी 2024 मध्ये पुन्हा या देशाचे पंतप्रधान होतील”, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.

    follow whatsapp