Gram Panchayat Election Result Dilip Walse Patil : सगळ्यांचं लक्ष असलेल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींचे निकाल अखेर जाहीर झाले. अनेक ठिकाणी अपेक्षित निकाल लागले, तर काही ठिकाणी आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या गावातच धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
दिलीप वळसे पाटील यांचं गाव असलेल्या निरगुडसर ग्रामपंचायतीचं सरपंचपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलं आहे. शिंदे गटाचे रवींद्र वळसे यांनी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. निरगुडसर ग्रामपंचायतींवर स्थापनेपासून दिलीप वळसे पाटलांचं वर्चस्व होतं. 73 वर्षानंतर गावाची सत्ता पाटलांकडून गेल्याने त्यांना हा मोठा धक्का मानला जातोय. ग्रामपंचायत जिंकली, पण सरपंच पद गेल्याने गड आला पण सिंह गेला अशी अवस्था वळसे-पाटलांची झालीये.
निरगुडसर ग्रामपंचायत निकाल काय?
युती सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. दिलीप वळसे पाटील यांना या निवडणुकीत फटका बसला आहे. निरगुडसर ग्रामपंचायतीत वळसे पाटलांचे पाच सदस्य निवडून आले आहेत. या आधी पाटलांचे तीन सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत.
Gram Panchayat Election Result : रोहित पवारांना शिंदेंनी कर्जतमध्ये दिला झटका
ग्रामपंचायतीत वळसे पाटलांचे बहुमत असणार आहे. असं असलं तरी सरपंचपद मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलं आहे. शिंदे गटाच्या रवींद्र वळसे यांनी राष्ट्रवादीच्या संतोष टाव्हरे यांचा पराभव केला आहे. तब्बल 135 मतांनी वळसेंनी टाव्हरेंचा पराभव केला आहे. हा लोकशाहीचा विजय असल्याचं नवनिर्वाचित सरपंच रवींद्र वळसे यांनी म्हटलं आहे.
शिवाजी आढळराव पाटलांनी दिला धक्का
शिवाजी आढळराव पाटलांनी स्थानिक राजकारणावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यापासून आढळराव पाटलांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, स्थानिक दौरेही केले जात आहे. आढळराव पाटलांच्या वाढत्या जनसंपर्काचा थेट दणका वळसे पाटलांना बसला असल्याचे म्हटले जात आहे.
Video : पिटबुल तोडत होता लचके अन् कुटुंब पाहत राहिलं, भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद
एकीकडे अजित पवार यांच्या बारामती आणि इंदापुरात अजित पवार गटाला चांगलं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे वळसे पाटलांनी स्वतःच्या गावातील सरपंच पद गमवावं लागलं आहे. या निकालाबद्दलची वळसे पाटील यांची प्रतिक्रिया अजून समोर आलेली नाही.
ADVERTISEMENT