मध्य प्रदेशाच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी भाजपने सगळी पक्षाची सगळी कमान शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्याऐवजी मोहन यादव (CM Mohan Yadav) यांच्याकडे दिली. गेल्या 18 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांनी राजीनामा दिला. शिवराज सिंह चौहान यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना काही महिला भेटायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्यांचे अश्रू (Emotional)त्यांना अनावर झाले, आणि त्या ढसाढसा रडू लागल्या. महिला भावूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांना जवळ घेऊन त्यांना समजावता समजावता शिवराज सिंहही भावूक झाल्या.
ADVERTISEMENT
अश्रू झाले अनावर
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि त्या भावूक झालेल्या महिलांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवराज सिंह चौहान यांना भेटणाऱ्या महिलांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही, त्या गोष्टीचं त्यांना प्रचंड दुःख झालं आणि त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्यावर मात्र त्यांना शिवराज सिंह यांनीच त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा >> MLA Disqualification Case : ‘उद्धव ठाकरे आजही पक्षप्रमुख आहेत का?’, राहुल शेवाळेंनी सुनावणीत दिले उत्तर
मुख्यमंत्री पद गुलदस्त्यात
मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत 230 जागांपैकी 163 जागांवर भाजपने विजयाची मोहोर उमटवली आहे. मात्र या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे गुलदस्त्यातच ठेवले होते. त्यानंतर सोमवारी आमदारांच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपकडून घोषित करण्यात आला.
आणि मोहन यादवांनी केला दावा
शिवराज सिंह चौहान यांनी या बैठकीत मोहन यादव यांच्या नावावर शिक्का मोर्तब केला, आणि त्याला सर्व आमदारांनीही सहमती दर्शवली. त्यानंतर भाजपनेही मोहन यादव यांच्या नावाचीच घोषणा केली. त्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. तर त्यानंतर मोहन यादव यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
ADVERTISEMENT