शिर्डी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात मंत्री धनंजय मुंडे यांनी तुफान भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. पण त्याचवेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ADVERTISEMENT
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता बीडचं पालकमंत्री पदही त्यांच्या हातून गेलं आहे. अशावेळी आज शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण करत आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांच्या काळजाला हात घालण्याचाही प्रयत्न केला.
पहाटेच्या शपथविधीबाबत धनंजय मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट, पाहा नेमकं काय म्हणाले..
'महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन आपण 2019 च्या निवडणुकीला लढलो. भले मोठं यश आलं नाही पण 2014 पेक्षा चांगले आमदार निवडून आले. हे मात्र निश्चित की, त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या प्रत्येक सहकाऱ्याचं यश आहे. हे मान्य करायलाच पाहिजे. आता 2019 नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे? पण सांगितला गेला पाहिजे..'
हे ही वाचा>> Beed Guardian Minister: धनजंय मुंडे म्हणतात, 'मीच सांगितलेलं मला कोणतंही पालकमंत्री नको...'
'का सांगितला गेला पाहिजे.. अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत.. त्याला पहाट म्हणत नाही. असं दादा नेहमी म्हणतात. पण कदाचित त्या शपथविधीच्या अगोदर.. साहेब आपण पण साक्षीदार आहात.'
'मी दादांना विनंती केली होती... आज स्पष्टपणाने बोलतो.. कधीही बोललो नाही कारण.. इथे फक्त आणि फक्त दादांच्या पक्षाचे एकनिष्ठ सहकारी आहेत. म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतोय.'
हे ही वाचा>> CM फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना मोठा हादरा, पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण...
'त्यावेळेस मी म्हटलं होतं दादांना.. तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा.. मी दादांना सांगितलेलं की, शपथ घेऊ नका! का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या.. त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं.. म्हणलं 'दादा आपला घात होतोय..'
'दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं की, असला घात वैगरे काही होत नसतो. शेवटी व्हायचं तेच झालं.. त्यावेळेस पासून आपल्या या दादांना व्हिलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्या वेळेपासून चालू होतं. पण ही वस्तुस्थिती आहे.'
'आता पहाट होती त्यामुळे मला त्या शपथविधीला येता आलं नाही. पहाटेचं आणि आपलं तसं जमत नाही. पण घेणं एक नाही ना घेणं दोन.. पण शिक्षा मात्र मला झाली हे तर मान्य करता की नाही? कोणी जरी हो म्हणत नसलं तरी मागे शंकरभाऊ हो म्हणत आहेत.'
'त्यानंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मान्यवर नेत्यांनी ठरवलं की, आपल्याला भाजपसोबत युती करावी लागते तेव्हा दादांनी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो आणि आज खऱ्या अर्थाने असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती.' असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
