Beed Guardian Minister: धनजंय मुंडे म्हणतात, 'मीच सांगितलेलं मला कोणतंही पालकमंत्री नको...'

Dhananjay Munde Guardian Minister: कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात येऊ नये अशी मागणी स्वत:च केली असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून केला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:22 PM • 18 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

धनंजय मुंडेंना कोणत्याही जिल्ह्याच पालकमंत्री पद नाही

point

कोणतंही पालकमंत्री पद देऊ नये अशी स्वत: मागणी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा

point

बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजित पवारांनी स्वीकारावं अशी मागणीही स्वत:च केल्याचाही धनंजय मुंडेंचा दावा

Dhananjay Munde Social Media Post: बीड: महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यापासून कोणाला कोणतं पालकमंत्री पद मिळणार यावर जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. याच दरम्यान, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण हे समोर आलं आणि यातूनच धनंजय मुंडे हे बीड पालकमंत्री नको अशी एक मागणी सुरू झाली होती. अखेर तशाच स्वरूपाचा अत्यंत मोठा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. (i told cm devendra fadnavis and ajit pawar that they should not give me the guardian minister of any district dhananjay munde big claim)

हे वाचलं का?

केवळ बीडच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याची पालकमंत्री पद हे धनंजय मुंडेंना देण्यात आलं नाही. त्यामुळे ही धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा तर नाही ना? अशी चर्चा सुरू झालेली असताना आता धनंजय मुंडे यांनी तात्काळ सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, आपल्याला कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे देण्यात येऊ नये अशी त्यांनी अजितदादांना विनंती केली होती.'

हे ही वाचा>> CM फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना मोठा हादरा, पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण...

कोणतंही पालकमंत्री पद मिळालं नाही, पाहा धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले 

कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद न मिळाल्याचं समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी असा दावा केला की, 'बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजितदादा यांनीच स्वीकारावं आणि आपल्याला कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात येऊ नये अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना केली होती.'

'मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको', धनंजय मुंडेंची पोस्ट जशीच्या तशी

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.

हे ही वाचा>> सर्वात मोठी बातमी! फडणवीस सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, सर्व नावं वाचा एका क्लिकवर

बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.

सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.

पाहा नव्या पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी 

1) गडचिरोली - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
2) ठाणे - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
3) मुंबई शहर - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
4) पुणे - अजित पवार, उपमुख्यमंत्री
5) बीड - अजित पवार, उपमुख्यमंत्री
6) नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
7) अमरावती - चंद्रशेखर बावनकुळे
8) अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे पाटील
9) वाशिम - हसन मुश्रीफ
10) सांगली - चंद्रकांत पाटील
11) नाशिक - गिरीश महाजन
12) पालघर - गणेश नाईक
13) जळगाव - गुलाबराव पाटील
14) यवतमाळ - संजय राठोड
15) मुंबई उपनगर - आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
16) रत्नागिरी - उदय सामंत
17) धुळे - जयकुमार रावल
18) जालना - पंकजा मुंडे
19) नांदेड - अतुल सावे
20 ) चंद्रपूर - अशोक उईके
21) सातारा - शंभुराज देसाई
22) रायगड - आदिती तटकरे
23) लातूर - शिवेंद्रसिंह भोसले
24) नंदूरबार - माणिकराव कोकाटे
25) सोलापूर - जयकुमार गोरे
26) हिंगोली - नरहरी झिरवळ
27) भंडारा - संजय सावकारे
28) छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाट
29) धाराशिव - प्रताप सरनाईक
30) बुलढाणा - मकरंद जाधव
31) सिंधुदुर्ग - नितेश राणे
32) अकोला - आकाश फुंडकर
33) गोंदिया - बाबासाहेब पाटील
34) कोल्हापूर - प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)
35) गडचिरोली - आशिष जैस्वाल (सह पालकमंत्री)
36) वर्धा - पंकज भोयर
37) परभणी - मेघना बोर्डीकर

    follow whatsapp