Imran Pratapgarhi : काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. इम्रान यांच्या कवितेबद्दल गुजरातमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयानं महत्वाची टिपण्णी केली. "कविता, कला आणि व्यंगचित्रं जीवन समृद्ध करतात. समाजासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे. पोलिसांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील याची काळजी घेतली पाहिजे."
ADVERTISEMENT
काय होते आरोप?
इम्रान प्रतापगढी हे गुजरातच्या जामनगरमध्ये सामुहिक विवाह सोहळ्यात पोहोचले होते. तिथे फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. याच एन्ट्रीचा व्हिडीओ इम्रान प्रतापगढी यांनी पोस्ट केला होता. मात्र, या व्हिडीओला लावलेल्या गाण्यावर आक्षेप घेण्यात आला होता.
एफआयआरमध्ये, इम्रान प्रतापगढी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अपलोड केलेल्या 46 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला जात होता. एक गाणं बॅकग्राऊंड म्युझिकला होतं. ते गाणं आक्षेपार्ह आहे. गाण्याच्या ओळी चिथावणीखोर, राष्ट्रीय एकात्मतेला मारक आणि धार्मिक भावना दुखावणारे आहेत सा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
हे ही वाचा >> "ती भांडायची, सर्कीटसारखी वागायची...", पत्नीला मारून सुटकेसमध्ये टाकणाऱ्या आरोपीचे वडील काय म्हणाले?
व्हिडिओ प्रक्षोभक व्हिडीओ असल्याचा आरोप करत यावर आक्षेप घेत गुजरातमधील जामनगरमध्ये इम्रान प्रतापगढ़ी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढ़ी यांनी 'गुजरात पोलिसांनी दुर्भावनापूर्ण हेतूने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता' असं म्हटलं होतं.
सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात काय म्हटलं?
"अनेकांना दुसऱ्यांचे विचार आवडत नसले, तरी एखाद्या व्यक्तीचा मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचं आदर आणि संरक्षण केलं पाहिजे. कविता, नाटक, चित्रपट, व्यंगचित्र आणि कला यासह साहित्य लोकांचं जीवन अधिक अर्थपूर्ण बनवतं." असं कोर्टानं निर्णयात म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की, प्रत्येक गोष्टीला धोका किंवा टीका म्हणून पाहणाऱ्यांकडे मानकं म्हणून पाहू नका. मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यात पोलीस अपयशी ठरले तर हस्तक्षेप करणं आणि अधिकारांचं संरक्षण करणं हे न्यायालयांचं कर्तव्य आहे. विचारांचा आदर आणि संरक्षण केलं पाहिजे. विचार आणि विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य महत्वाचे आहे.
काय होते त्या कवितेतील शब्द?
ऐ ख़ून के प्यासों बात सुनो
गर हक़ की लड़ाई ज़ुल्म सहें
हम ज़ुल्म से इश्क़ निभा देंगे
गर शम्मआ ए गिरिया आतिश है
हर राह वो शम्मआ जला देंगे
गर लाश हमारे अपनों की,
ख़तरा है तुम्हारी मसनद का
उस रब की कसम हंसते-हंसते
इतनी लाशें दफना देंगे
ऐ खून के प्यासों बात सुनो...
हे ही वाचा >> नवी मुंबईत 3 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, शोधाशोध सुरू असताना टॉयलेट सिटवर सापडला मृतदेह, घटना काय?
न्यायमूर्ती अभय एस. ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गुजरातमधील जामनगर येथील इम्रान प्रतापगढ़ी यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. 3 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने इम्रानच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. 17 जानेवारी रोजी गुजरात उच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांची याचिका फेटाळली होती.
कुणाल कामराच्या रचनेवरही आक्षेप
एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता कुणाल कामराने केलेल्या एका विडंबनात्मक काव्यामुळे महाराष्ट्रातही मोठा वाद झाला. त्यानंतर आता स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात महाराष्ट्रा विधानसभा, विधान परिषदेत हक्कभंग आणण्यात आला आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी 24 मार्च 2025 रोजी कुणाल कामरावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 353(1)(ब) (सार्वजनिक उत्पाताशी संबंधित बयान) आणि 356(2) (मानहानी) अंतर्गत FIR दाखल केली. तसेच, शिवसेना नेते राहुल कनाल यांनी 27 मार्च 2025 रोजी खार पोलिस ठाण्यात आणखी एक तक्रार दाखल करून कामरावर दहशतवादी संघटनांकडून आर्थिक मदत मिळत असल्याचा गंभीर आरोप केला, ज्याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यामुळे या प्रकरणात काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कुणाल कामरालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराखाली दिलासा मिळणार की कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे.
ADVERTISEMENT
