Gauri Khedekar Murder Case : बंगळुरूच्या हुलीमायू पोलीस स्टेशन परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोड्डकम्मनहल्ली शहरातील एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला. महिलेची हत्या तिच्या पतीनेच केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. एवढंच नाही, तर आरोपी पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले आणि त्यानंतर फ्लॅटला कुलूप लावून पुण्याला पळून गेला. पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे हे जोडपं मुळ महाराष्ट्रातलं असून, कामासाठी बंगळुरूमध्ये राहत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
पती-पत्नी महाराष्ट्रातले रहिवासी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी खेडकर असं मृत महिलेचं नाव असून राकेश राजेंद्र खेडकर असं आरोपी पतीचं नाव आहे. दोघंही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. पोलिस उपायुक्त सारा फातिमा यांनी सांगितलं की, महिला आणि तिचा पती गेल्या महिन्यात बंगळुरूला शिफ्ट झाले होते. त्यांनी सांगितलं की गौरीने मास मीडियामध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. तिचा नवरा एका खासगी कंपनीत काम करतो. यावेळी तो घरून काम करत होता.
घरमालकाने पोलिसांना दिली माहिती
हे ही वाचा >> नवी मुंबईत 3 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, शोधाशोध सुरू असताना टॉयलेट सिटवर सापडला मृतदेह, घटना काय?
घरमालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली असता, हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरलेला असून तिच्या शरीरावर चाकूच्या जखमा असल्याचं पोलिसांनी सांगितले. त्यानंतर फॉरेन्सिक तज्ञांना बोलावण्यात आलं आणि त्यांनी घटनास्थळावरून नमुने गोळा केले. खून केल्यानंतर राकेश राजेंद्र खेडकर पुण्याला पळून गेला होता. तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी सांगितले की, आरोपीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले असून त्याला बंगळुरूला आणले जात आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हत्येमागील कारण समजेल.
पत्नीच्या हत्येनंतर सासू, सासऱ्याला फोन केला
हे ही वाचा >> संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
त्याचवेळी, काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जातोय की, खून केल्यानंतर आरोपी पती राकेश राजेंद्र यानेही सासरच्या लोकांना फोन केला. फोनवर त्यानं सांगितलं की, मी पत्नीची हत्या केली. तसंच मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला आहे. त्याचवेळी आरोपीनं आपल्या पत्नीच्या हत्येबाबत सासरच्या मंडळींना माहिती दिल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया विचारली असता, सारा फातिमा म्हणाल्या की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सर्व गोष्टींची खातरजमा केल्यानंतरच आम्ही याबद्दल माहिती देऊ.
ADVERTISEMENT
