सोशल मीडियावर ट्रेंड करतंय Ghibli, फडणवीसांनीही केली पोस्ट; नेमकं काय आहे Ghibli?

Ghibli Images : OpenAI च्या GPT-4o मॉडेलच्या माध्यमातून हा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे.  या नवीन इन-बिल्ट इमेज जनरेशन टूलद्वारे लोक स्टिकर्स, साइनबोर्ड, मीम्स आणि अगदी खरे वाटावे असे फोटो तयार करत आहेत. 

Mumbai Tak

मुंबई तक

28 Mar 2025 (अपडेटेड: 28 Mar 2025, 06:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Chat GPT Ghibli नेमकं काय?

point

सोशल मिडियावर तुफान ट्रेंड होतंय Ghibli

point

तुमचा फोटो Ghibli वर कसा तयार कराल?

Chat GPT Ghibli दोन दिवसांपासून सोशल मिडियावर ट्रेंड आहे. चॅट जीपीटी तुम्ही ऐकलं असेल, पण Ghibli हे नाव तुम्ही कदाचित पहिल्यांदा ऐकलं असेल. नुकतंच ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचा प्रोफाइल फोटो म्हणून Ghibli मध्ये तयार केलेली इमेज वापरली. तसंच त्यांच्यानंतर आता अनेक दिग्गज राजकारणी, नेते आणि प्रसिद्ध चेहऱ्यांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. जाणून घेऊया काय आहे हा नवीन ट्रेंड? 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> "ती भांडायची, सर्कीटसारखी वागायची...", पत्नीला मारून सुटकेसमध्ये टाकणाऱ्या आरोपीचे वडील काय म्हणाले?

ChatGPT वापरणाऱ्यांनी हा नवीन ट्रेंड चांगलाच फॉलो केला आहे. Ghibli-format मध्ये अनेकांनी त्यांचं काल्पनिक जग स्वीकारण्यास सुरुवात केली. आता चित्रपटातले दृश्यं, भावनिक क्षण, बालपणीच्या आठवणी आणि अगदी प्रपोज करतानाचे क्षण सोशल मीडियावर Ghibli स्टाईलने पुन्हा तयार केले जात आहेत.  एलोन मस्क हे सुद्धा या ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. तर इथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही Ghibli स्टाईलमध्ये एक इमेज शेअर केली आहे.

काय आहे Ghibli चा ट्रेंड?  

Ghibli Images : OpenAI च्या GPT-4o मॉडेलच्या माध्यमातून हा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. या नवीन इन-बिल्ट इमेज जनरेशन टूलद्वारे लोक स्टिकर्स, साइनबोर्ड, मीम्स आणि अगदी खरे वाटावे असे फोटो तयार करत आहेत.

Ghibli-सारखा फोटो कशी तयार करावी?

chat.openai.com ला भेट द्या आणि तुमच्या OpenAI खात्याच्या क्रेडेंशियल्सने लॉग इन करा.

लॉग इन केल्यानंतर, "New Chat" बटणावर क्लिक करून नवीन संभाषण सुरू करा.

मेसेज इनपुट फील्डमध्ये, तुम्हाला जनरेट करायच्या असलेल्या इमेजसाठी एक वर्णन (प्रॉम्प्ट) टाइप करा. उदाहरणार्थ : स्टुडिओ Ghibli च्या स्टाईलमध्ये इमेज तयार करण्यासाठी, तुम्ही लिहा Show me in Studio Ghibli style 

तुमचा प्रॉम्प्ट सबमिट करण्यासाठी एंटर दाबा. ChatGPT तुमच्या त्यावर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला हवी असलेली इमेज जनरेट करेल.

फोटो तयार झाल्यानंतर, तुम्ही त्यावर उजव्या बाजूला-क्लिक करून तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड करण्यासाठी "सेव्ह इमेज म्हणून..." पर्याय निवडू शकता.

तुम्ही अशा पद्धतीचे फोटो ट्वीटर अकाऊंटवरील 'ग्रोक'वरही तयार करु शकता.

हे ही वाचा >> 'वादग्रस्त' कवितेच्या प्रकरणात इम्रान प्रतापगढींना दिलासा, काय होतं प्रकरण? कुणाल कामरालाही...

Ghibli म्हणजे काय?

जर तुम्हाला स्टुडिओ Ghibli माहिती नसेल, तर ते सोप्या भाषेत समजावून घेऊ. स्टुडिओ Ghibli हा प्रसिद्ध जपानी ॲनिमेशन स्टुडिओ आहे. 1985 मध्ये दिग्गज ॲनिमेशन दिग्दर्शक हायाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी याची स्थापना केली होती. हा स्टुडिओ त्याच्या सुंदर कलेसाठी आणि खास थीमसाठी ओळखला जातो."


 

    follow whatsapp