INDIA च्या मुंबईतील बैठकीची वेळ आणि तारीख ठरली, ‘इथे’ होणार खलबतं

रोहित गोळे

05 Aug 2023 (अपडेटेड: 05 Aug 2023, 10:18 AM)

INDIA या आघाडीची पुढची बैठक ही मुंबईत होणार आहे. याबाबत आज अनेक गोष्टी निश्चित करण्यात आल्या आहेत. याचविषयी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी काही महत्त्वाची माहिती दिली.

india alliance next meeting 31st aug mumbai shiv sena ubt leader sanjay raut gave some important information political news headlines today

india alliance next meeting 31st aug mumbai shiv sena ubt leader sanjay raut gave some important information political news headlines today

follow google news

INDIA alliance Mumbai Meeting Time Date and Venue: मुंबई: देशातील भाजप (BJP) सरकारविरोधात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशातील अनेक प्रमुख विरोधी पक्षाची INDIA ही नवी आघाडी तयार झाली असून याच आघाडीची तिसरी बैठक ही आता मुंबईत (Mumbai) पार पडणार आहे. याआधी पाटणा आणि बंगळुरूमध्ये या बैठका झाल्या होत्या. तर तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या नियोजनासाठी राज्यातील विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते आज (5 ऑगस्ट) एकत्र आले होते. जिथे या बैठकीची तारीख, वेळ आणि ठिकाण ठरविण्यात आलं. याच संबंधीची महाविकास आघाडीमधील (MVA) प्रमुख घटक पक्षाची आजची बैठक ही मुंबईतील वरळीत पार पडली. (India alliance next meeting 31st aug mumbai shiv sena ubt leader sanjay raut gave some important information political news headlines today)

हे वाचलं का?

दरम्यान, या बैठकीनंतर शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INDIA ची बैठक कुठे होणार याबाबत नेमकी माहिती दिली. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले.

मुंबईत INDIA ची बैठक कुठे आणि कधी होणार?

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले. ‘INDIA म्हणून जे आमचं संघटन आहे.. INDIA गटाची बैठक झाली. पटना, बंगळुरू आणि आता मुंबईत.. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडियाची बैठक होईल. 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ही बैठक सुरू होईल आणि 1 सप्टेंबरला देखील ती असेल.’

‘31 ऑगस्टला रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व निमंत्रितांसाठी एका डिनरचं आयोजन केलेलं आहे. 1 तारखेला सकाळी साडे दहा वाजता बैठकीला सुरुवात होईल. 3 वाजेपर्यंत बैठक असेल आणि त्यानंतर पत्रकार परिषद होईल.’

‘मुंबईतील बैठकीचं यजमानपद हे शिवसेनेकडे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचे सहकारी आहेत. आम्ही एकत्र काम करू पण यजमान हे शिवसेना उद्धव ठाकरे हे आहेत.’

हे ही वाचा >> Nitin desai आत्महत्या प्रकरणी ‘या’ 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘प्रत्येकाकडे काही जबाबदाऱ्या आहेत. त्याचं वाटप झालं आहे. ही बैठक सुद्धा पाटणा आणि बंगळुरूप्रमाणे यशस्वी होईल. याविषयी आम्ही चर्चा केली. यामध्ये शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शिवसेनेकडून उद्धवजी आणि मी स्वत: होतो. तसेच सुभाष देसाई आणि अनिल देसाई हे देखील होते.’

‘लवकरच आम्ही पुढल्या कामाला आम्ही सुरुवात करू. सगळ्यांचं एकमत आहे की, ही बैठक आपण यशस्वी करू.’

‘मुंबईत बैठक.. आम्ही इथल्या सरकारसोबतही ‘त्याविषयी’ बोलू’

दरम्यान, आतापर्यंत इंडियाच्या पाटणा आणि बंगळुरु येथे दोन बैठका पार पडल्या. या दोन्ही राज्यात भाजपेतर सरकार अस्तित्वात आहे. मात्र, महाराष्ट्रात सध्या भाजपचं सरकार आहे. अशावेळी बैठकीच्या आयोजनात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. याबाबतही संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
ज्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘होय.. अडचणी आहेत काही.. अनेक राज्याचे मुख्यमंत्री.. किमान पाच मुख्यमंत्री आहेत. तामिळनाडू, प. बंगाल, झारखंड यासह पाच राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत. अनेक माजी मुख्यमंत्री, प्रमुख नेते स्वत: राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे हे सगळे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सरकार नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण असं ठरलं आहे की, जे आम्ही प्रमुख लोकं बसलो होतो त्यांच्यावतीने सरकारशी संवाद साधला जाईल.’

हे ही वाचा >> BMC: ठाकरेंना आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

‘यात सरकारचं सुद्धा आम्हाला सहकार्य हवं आहे. कारण अनेकांची सुरक्षा व्यवस्था आहे, वाहतूक व्यवस्था आहे याचा ताण पडू शकतो. त्यामुळे सरकारने सहकार्य करावं यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल.’ अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

    follow whatsapp