India Today Conclave 2024, Nitin Gadkari : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचे विधान केले होते. गडकरींच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. असे असताना आता इंडिया टूडे कॉनक्लेववर (India Today Conclave 2024) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पंतप्रधानाच्या या ऑफरबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत? ते जाणून घेऊयात. (india today conclave 2024 nitin gadakari speack on opposition offer for prime minister post )
ADVERTISEMENT
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांनी तुम्हाला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती का?, असा सवाल इंडिया टूडे कॉनक्लेववर नितीन गडकरी यांना विचारण्यात आला होता. यावर नितीन गडकरी यांनी लोकसभेआधीही आणि नंतर देखील ऑफर आली होती, असा खळबळजनक खुलासा केला. तसेच ''पंतप्रधान बनणे हे माझ्या आयुष्याचे लक्ष्य नाही. मी माझ्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. पंतप्रधान बनणे हे माझ्या आयुष्याचे उद्देश्य नाही आहे. मी माझ्या विचारधारेसोबतच आहे. त्यामुळे विरोधकांची ऑफर स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे गडकरींनी स्पष्टच सांगितले.
हे ही वाचा : Exclusive: 'माझा एन्काउंटरवर विश्वास नाही, पण...', अक्षय शिंदे चकमकीवर फडणवीसांचं मोठं विधान
नितीन गडकरी पुढे म्हणाले, ऑफर कुणी दिली हे सांगणे हे नैतिकतेत बसत नाही. तसेच मी सध्या जिथे आहे तिथे खूश आहे. तसेच नितीन गडकरी यांच्याकडे गेली दहा वर्षे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांना त्यांच्या अनुभवानुसार जास्त मंत्रिपद मिळू नये का, असा सवाल त्यांना करण्यात आला होता. यावर ते म्हणाले, "मी कधीही कोणाकडे काही मागायला गेलो नाही. मी 5 टक्के राजकारण आणि 95 टक्के समाजसेवेवर विश्वास ठेवतो, असे गडकरींनी सांगितले.
मोदींचे वाढते वय आणि RSS मधील तुमची विश्वासार्हता पाहता, पंतप्रधानानंतर तुमचं प्रमोशन मिळेल का? यावर गडकरी म्हणाले की, मी कोणत्याच शर्यतीत नाही. आरएसएसचा मी स्वयंसेवक आहे. माझे मोदींसोबत खूप चांगले नाते आहे, असे गडकरींनी यावेळी स्पष्ट केले.
"मी काही बनण्यासाठी राजकारणात आलो नाही. कोणीही कोणाला पुढे जाऊ देत नाही, पण आज मी मनापासून बोलत आहे की मला कोणतीही अडचण नाही." पंतप्रधान होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. जर मी त्याची लायक असेल तर मला ती मिळेल, असे देखील गडकरींनी सांगितली.
हे ही वाचा : Aaditya Thackeray: एका 'आपटे'ला वाचवण्यासाठी 'शिंदेला' मारलं... 'त्या' Encounter बाबत ठाकरेंचा मोठा आरोप
ADVERTISEMENT