Pankaja munde : गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिव परिक्रमा यात्रा जोरदारपणे सुरु आहे. त्यानिमित्त पंकजा मुंडे यांनी हिंगोली जिल्ह्याचा दौरा केला. त्या दौऱ्यावेळी त्यांनी औंढा नागनाथ येथे त्यांनी नागनाथाचेही दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर आणि भाजपवरही (BJP) त्यांनी खोचकपणे आपले मत व्यक्त केले. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं काम कसं आहे यावर बोलताना मात्र त्यांनी खोचकपणे बोलत सरकारवर बोलणं टाळले आहे.
ADVERTISEMENT
ते प्रेम मला मिळावं
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शिव परिक्रमा यात्रा करत आणि लोकांमध्ये जात त्यांनी नागरिकांबरोबर संवाद साधला. यावेळी लोकांमधूनही त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सामान्य जनतेने गोपीनाथ मुंडे यांना जे प्रेम दिले, ते प्रेम मला मिळावे. यासाठी मी नागनाथाकडे प्रार्थाना केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘फडणवीसांनी दिलेले मराठा आरक्षण फसवणूक करणारे’, पृथ्वीराज चव्हाण यांनी केले गंभीर आरोप
शक्तिप्रदर्शन नाही ती माझी शक्ती
पंकजा मुंडे यांनी शिव परिक्रमा यात्रा काढल्यानंतर त्यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केले जात असल्याचीही टीका होऊ लागली. त्यावर मात्र पंकजा मुंडे यांनी सांगितले की, हे शक्तिप्रदर्शन नाही तर ही माझी शक्ती आहे. लोकांनीच मला शक्ती दिल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सर्टिफिकेशन द्यायची माझी कंपनी नाही
पंकजा मुंडे यांची शिव परिक्रमा यात्रा चालू असताना त्यांच्यावर फुलांची उधळण आणि इतर कार्यक्रमांमुळे ही यात्रा प्रचंड गाजत आहे. लोकांमधून मिळणाऱ्या प्रतिसादामुळेही त्यांना भाजपसंदर्भात अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. यावेळी त्यांना शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं काम कसं सुरू आहे असे विचारले असता त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले की, सर्टिफिकेशन द्यायची माझी कंपनी नाही म्हणत त्यांनी भाजपवर खोचक प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा >> Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पाणीही सोडलं; डॉक्टर आले, पण…
राज्य सरकारवर नाराजीचा सूर
पंकजा मुंडे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर बोलताना त्यांनी खोचक प्रतिक्रिया देत बोलणं टाळलं. त्याचं सर्टिफिकेशन द्यायची माझी कंपनी नाही असे शब्दात त्यांनी राज्य सरकारच्या कामावर प्रतिक्रिया दिल्याने त्या राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
ADVERTISEMENT