Jio, Airtel, Vi आणि BSNL च्या ग्राहकांना लवकरच स्वस्त रिचार्जचा पर्याय मिळू शकतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने सर्व दूरसंचार ऑपरेटर्सना ग्राहकांसाठी कॉलिंग आणि एसएमएस केंद्रीत योजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
जर तुम्ही सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सच्या रिचार्ज प्लॅनच्या पोर्टफोलिओवर नजर टाकली, तर तुम्हाला असं दिसून येतं की, तुम्हाला मिळणाऱ्या सर्व योजना 'डेटा'वर आधारीत आहेत. म्हणजेच यामध्ये तुम्हाला कॉलिंग, एसएमएस आणि डेटा या तिन्ही गोष्टी मिळतात. अशा परिस्थितीत डेटाची गरज नसलेल्या अनेक ग्राहकांना डेटासाठी पैसे खर्च करावे लागतात.
सिम ॲक्टिव्ह ठेवणं महाग
हे ही वाचा >> Mumbai Crime News : कोट्यवधी रुपयांच्या 3 सोन्याच्या विटा लंपास, मुंबईतील गिरगावमध्ये दरोड्यात...
अशा रिचार्ज प्लॅन्समुळे Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या वापरकर्त्यांना त्यांचे सिम सुरू ठेवण्यासाठी महिन्याला किमान 200 रुपये खर्च करावे लागतात. तर काही ग्राहक असेही आहेत ज्यांना जास्त दिवसांसाठीचे रिचार्ज प्लॅन हवे आहेत. पण कॉलिंग आणि मेसेजवर आधारीत असलेला असा कोणतीही प्लॅन सापडत नाही.
कंपन्यांनी विरोध केला होता
हे ही वाचा >> Suresh Dhas : "मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रिपद...."; सुरेश धस यांचा मुंडेंना थेट विरोध?
ट्रायने यापूर्वीही याबाबत कंपन्यांकडून सूचना मागवल्या होत्या, ज्यामध्ये टेलिकॉम कंपन्यांनी स्पष्ट विरोध केला होता. अशा कोणत्याही नव्या योजनेची गरज नसल्याचं कंपन्यांनी सांगितलं होतं. अशा योजना ग्राहकांसाठी आधीच आम्ही देत आहोत असं कंपन्या म्हणाल्या होत्या.
दरम्यान, वास्तव पाहिल्यास दूरसंचार कंपन्यांनी आजीवन मोफत इनकमिंगची सुविधा काही वर्षांपूर्वीच बंद केली आहे.
ADVERTISEMENT
