“बालबुद्धी, मंदबुद्धी”! शिवसेनेने आदित्य ठाकरेंना डिवचलं, पावसकर काय म्हणाले

मुंबई तक

25 Jun 2023 (अपडेटेड: 25 Jun 2023, 12:48 PM)

किरण पावसकर (kiran pawaskar) हे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांवरील टीकवर बोलताना पावसकर म्हणाले की, ठाकरे घराण्याची जी बालबुद्धी आहे, त्या बाल बुद्धीविषयी सांगायचे तेवढे कमी आहे. मला वाटायचे तो खरोखर बालबुद्धी आहे, पण बालबुद्धी नव्हे तर मंदबुद्धी आहे, अशी टीका किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

kiran pawaskar criticize aditya thackeray on cm eknath shinde stetement mumbai rain maharashtra politics

kiran pawaskar criticize aditya thackeray on cm eknath shinde stetement mumbai rain maharashtra politics

follow google news

मुंबईत एकीकडे पावसाचे आगमन झाले असतानाच राजकारणात मात्र टीकेचा महापूर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी “पाऊस आला स्वागत करा, पाणी तुंबलं याची तक्रार काय करता, असे विधान केले होते. या विधानावर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी ‘मुख्यमंत्र्यांकडून एवढा बालिशपणा आम्हाला अपेक्षित नाही’, अशी टीका केली होती. आता मुख्यमंत्र्यांवरील या टीकेचा शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर (kiran pawaskar) यांनी समाचार घेतला आहे. (kiran pawaskar criticize aditya thackeray on cm eknath shinde stetement mumbai rain maharashtra politics)

हे वाचलं का?

किरण पावसकर (kiran pawaskar) हे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांवरील टीकवर बोलताना पावसकर म्हणाले की, ठाकरे घराण्याची जी बालबुद्धी आहे, त्या बाल बुद्धीविषयी सांगायचे तेवढे कमी आहे. मला वाटायचे तो खरोखर बालबुद्धी आहे, पण बालबुद्धी नव्हे तर तो मंदबुद्धी आहे, अशी टीका किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी शेतकरी,अन्नदाता सुखी होतील, या कारणासाठी पावसाळ्याचे स्वागत करूया, असे विधान केल्याचेही स्पष्टीकरण दिले.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांकडून एवढा बालिशपणा…; आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर का संतापले?

चाळीत, झोपडपट्टीत राहणाऱ्यांना पावसाची प्रतिक्षा असते. पाऊस कधी पडेल आणि त्यांची कधी गरमीपासून सुटका होईल. पण काही लोकांचा पैसा लुटुन, काहींची मुले ही एसीत बसलेली असतात,अशी टीका देखील पावसकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली. तसेच ”ओ बालबुद्धी तु्म्ही जर शॉ़वर घेत असाल ना”, ”तर ते पाणी असेच निघून जात नाही”.ते पाणी जायलाही वेळ लागते, असे देखील पावसकर आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हणाले आहेत.मागची 25 वर्ष जे गटाराच्या गाळातून, कचऱ्यातून जो काय पैसा मिळत होता, यातून आपण मोठे झाला आहात, हे विसरू नका, तुमच्या बालपणाचा खर्च त्याच्यातून निघाला आहे अशी टीका देखील किरण पावसर यांनी केली आहे.

24 वर्षात पैसै खाल्लात

मुंबई महापालिकेत 24 वर्षात तुम्ही जी घाण करून ठेवली आहे. कॉन्ट्रॅक्टरपासून, दलाल, गाळ काढणाऱ्यांचे संगळ्यांचेच पैसे खाल्ले आहात, ती घाण 11 महिन्यात स्वच्छ होणार आहे का? असा सवाल देखील किरण पावसकर यांनी उपस्थित केला. तसेच तुम्ही 608 कोटींचा आरोप करताय, अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही, टेंडरींग प्रोसेस सुरू आहे. त्याच्या आधीच तुम्हाला भ्रष्टाचार दिसतोय. दिवसभर नुसता भ्रष्टाचार भ्रष्टाचार अन् खोक्यामध्ये बसलेली मंडळी आहात अशी टीका किरण पावसकर यांनी ठाकरेंवर केली आहे.

जे मुख्यमंत्री वर्षावरून 4 वेळा मंत्रालयात जाऊ शकले नाहीत ते घटनास्थळी जाणार आहेत का? माजी मुख्यमंत्री मुंबईत जागा बघून तरी आलेत का? वॉर रूमच्या बाहेर कधी पडलात का? असे अनेक सवाल देखील पावसकर यांनी ठाकरेंना केले आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे एक शिवसैनिक एवढ्या लोकप्रियतेवर पोहोचेल.याची त्यांना पोटदुखी होतेय अशी टीका देखील पावसकर यांनी केली.दरम्यान मुख्यमंत्र्याबाबत असे अपशब्द वापरले जात असेल तर त्याच्यावर सुमोटा कारवाई करा आणि त्याला अटक करा असी मागणी किरण पावसकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

    follow whatsapp