Rupali Thombare: "बाई काय हा प्रकार...तोच तो डर्टी पिक्चर", रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर?

मुंबई तक

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 05:46 PM)

Rupali Thombare Facebook Post: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यासाठी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्याही दिल्या जात असल्याचं समोर येत आहे.

Rupali Thombare Facebook Post Viral

Rupali Thombare Vs Rupali Chakankar

follow google news

बातम्या हायलाइट

point

रुपाली ठोंबरे यांची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल

point

रुपाली ठोंबरेंनी नेमका कुणावर साधला निशाणा?

point

'ती' व्हायरल पोस्ट वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Rupali Thombare Facebook Post: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यासाठी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्याही दिल्या जात असल्याचं समोर येत आहे. राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. यमाध्ये महायुतीतील घटक पक्ष भाजप (3), शिवसेना (2) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जणांची निवड करण्यात आली.

हे वाचलं का?

परंतु, या सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे या मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याशिवाय पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील नाराज असल्याचं समजतं. दरम्यान, असं असताना रुपाली ठोंबरे यांनी आज (22 ऑक्टोबर) केलेली फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?

रुपाली ठोंबरे यांनी केलेली फेसबुक पोस्टची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. पण ही पोस्ट नेमकी त्यांनी कोणासाठी लिहली आहे यावरून सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविण्यास सुरुवात केलेली असताना आज अचानक एक अशी पोस्ट केली की, ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

रुपाली ठोंबरेंची ती पोस्ट जशीच्या तशी...

"बाई काय हा प्रकार...किती वेळा तेच ते.."रात्रीस खेळ चाले" ची एवढी बजबजपुरी झाल्यानंतर मालिका बंद होईल असं वाटलं होतं. पण निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा...?", अशी पोस्ट रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. 

हे ही वाचा >> Maharashtra Elections 2024: कोणाच्या गाडीत सापडले 5 कोटी? रोहित पवारांनी थेट टाकला Video

मूळच्या मनसेच्या असलेल्या रुपाली ठोंबरे या यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पक्षात फूट पडल्यानंतर रुपाली ठोंबरे या अजित पवारांसोबत गेल्या. पण पक्षात त्यांना अद्याप तरी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या नसल्याने त्या नाराज असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे ही वाचा >> Sanju Samson: "T20 वर्ल्डकपची फायनल खेळणार होतो, पण रोहितने...", संजूने उडवली खळबळ

रुपाली ठोंबरे या अत्यंत आक्रमक शैलीत राजकारण करणाऱ्या नेत्या आहेत. त्यामुळे कोणत्याही मुद्द्यावर थेट बोलण्यास त्या प्रसिद्ध आहेत. आजवर त्यांनी विरोधकांसह स्वपक्षातील लोकांना देखील धारेवर धरल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. पण आज मात्र, ज्या पद्धतीने रुपाली ठोंबरे यांनी जी फेसबुक पोस्ट केली आहे ते पाहता त्यांचा रोख नेमका कुणावर आहे? याची चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर सुरू आहे.  

    follow whatsapp