“…तर परिस्थिती तातडीने बदलेल”, कोल्हापूर दंगलीवर शरद पवार काय बोलले?

मुंबई तक

08 Jun 2023 (अपडेटेड: 08 Jun 2023, 01:59 PM)

कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे स्टेट्स ठेवण्यावरून वाद झाला. हा वाद वाढून कोल्हापूरमध्ये प्रचंड हिंसाचार बघायला मिळाला. या सगळ्या प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी पवारांनी उपायही सांगितला.

violence broke out in kolhapur over aurangzeb post Sharad pawar

violence broke out in kolhapur over aurangzeb post Sharad pawar

follow google news

sharad pawar, kolhapur violence : कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे स्टेट्स ठेवण्यावरून वाद झाला. हा वाद वाढून कोल्हापूरमध्ये प्रचंड हिंसाचार बघायला मिळाला. प्रचंड दगडफेक झाली, मालमत्तांचं नुकसान झालं. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दोन दिवस कोल्हापूरसाठी तणावाचे राहिले. या सगळ्या प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी पवारांनी उपायही सांगितला.

हे वाचलं का?

बारामतीमध्ये शरद पवार यांनी गुरुवारी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. पवारांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली.

कोल्हापुरातील हिंसाचारावर पवार काय म्हणाले?

“राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तर हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. याठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनाही आवाहन आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडू नयेत”, असं शरद पवार म्हणाले.

“शासकीय यंत्रणा विशेषतः पोलीस यंत्रणा जी पावले टाकते त्या यंत्रणेला सर्वसामान्य माणसांनी सहकार्य द्यायची गरज आहे. आपण सर्वांनी यंत्रणेला सहकार्य केले तर परिस्थिती तातडीने बदलली असे चित्र आपल्याला बघायला मिळेल. कोल्हापूर शहर अथवा अन्य शहरांना सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी शांतता निर्माण केलीच पाहिजे”, असं आवाहन शरद पवारांनी केले.

“छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, ताराराणींचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे. काही लोक चुकीचे वागत असतील पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर, राज्य शासनाने सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही स्थिती बदलेल, शांतता प्रस्थापित होईल आणि त्याला सर्वांनी साथ द्यावी एवढेच आवाहन आहे”, अशा शब्दात शरद पवारांनी या हिंसाचारावर भाष्य केले.

विदर्भ दौऱ्यात पवारांच्या काय निर्दशनास आलं?

यावेळी शरद पवार म्हणाले, “राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली गेली, मात्र त्यावर कृती दिसत नाही. काल विदर्भात असताना एक गोष्ट लक्षात आली. मागील अतिवृष्टी आणि गारपिटीसाठी जी नुकसान भरपाई जाहीर झाली ती अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. ही चांगली गोष्ट नाही. शेवटी काळ्या आईशी जो ईमान राखतो, लोकांच्या भुकेचा जो प्रश्न सोडवतो त्याला संकटाच्या काळात शासनाने मदत केली पाहिजे. बळीराजाचा हा आग्रह काही चुकीचा नाही. त्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न माझ्यासारखे लोक निश्चित करतील”, असं म्हणत शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बाण डागले.

    follow whatsapp