NCP: जयंत पाटील, आव्हाडांबाबत अजित पवारांनी घेतला प्रचंड मोठा निर्णय

मुंबई तक

• 02:56 PM • 03 Jul 2023

जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्यात यावं याबाबतचं पत्र हे विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे. अशी माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली आहे.

A letter has been given to the Assembly Speaker that Jayant Patil and Jitendra Awad should be disqualified. This information has been given by Ajit Pawar himself.

A letter has been given to the Assembly Speaker that Jayant Patil and Jitendra Awad should be disqualified. This information has been given by Ajit Pawar himself.

follow google news

Maharashtra Political News in Marathi: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कारण की, अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासह 9 जणांना अपात्र करावं अशा आशयाचं पत्र हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं. मात्र, दुसरीकडे अजित पवारांनी आज (3 जुलै) पत्रकार परिषद घेत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याबाबत घेतलेल्या मोठ्या निर्णयाची माहिती दिली. (letter given assembly speaker jayant patil jitendra awhad should be disqualified dcm ajit pawar ncp maharashtra politics update)

हे वाचलं का?

काल (2 जुलै) रात्री 12 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनी घोषणा केली होती की, अजित पवार यांनी केलेली कृती पक्षशिस्तीचा भंग आहे. त्यामुळे त्यांच्यासह 9 जणांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जयंत पाटलांनी अशीही घोषणा केली होती की, विरोधी पक्ष नेतेपदी आणि प्रतोदपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पण असं असताना आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी असं सांगितलं की, प्रफुल पटेल यांनी कार्याध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं असून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय अजित पवारांनी हे देखील सांगितलं की, ‘जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरविण्यात यावं याबाबतचं पत्र हे आधीच विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे.

पाहा पत्रकार परिषदेत अजित पवार नेमकं काय म्हणाले:

‘मीडियामध्ये मी वाचलं की, 9 जणांवर अपात्रतेची कारवाई करावी.. असं बोलण्यात आलेलं आहे. मी आपल्या सांगू इच्छितो.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि पक्षाने मला विधीमंडळात नेता केलं आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे कालच आम्ही तशा पद्धतीने पत्र दिलं आहे.’

हे ही वाचा >> NCP: दादा की ताई…? ‘चावडी’वर गोंधळलेल्या प्रफुल पटेलांचा दोन आठवड्यातच मोठा प्रताप!

‘प्रफुल पटेल यांनी काल सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्ष पदावर नेमणूक केली आहे. ती नेमणूक झाल्यावर काही निर्णय घेतले आहेत. हे बोलत असताना एक बातमी वाचली की, एकाला विरोधी पक्ष नेता आणि प्रतोद म्हणून नेमलं गेलं आहे. वास्तविक मी विधीमंडळात बरेच वर्ष काम केलं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेता नेमायचं काम हे विधानसभा अध्यक्षाचं असतं. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना अध्यक्ष जो पक्ष सत्तेत नाही विरोधी पक्षात आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ज्या पक्षाची असते त्यांचा विरोधी पक्ष नेता म्हणून अध्यक्ष निवड करतात.’

‘आम्ही जे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत त्यातील आमदारांच्यामध्ये एक संभ्रमवस्था निर्माण व्हावी त्यांच्या भीती निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला काही अर्थ नाही. या संदर्भात शेवटी बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर म्हणजे आमच्याबरोबर आहेत. आम्ही सगळे जणं एकत्र काम करतोय. पुढेही आम्ही महाराष्ट्राच्या भल्याकरिता काम करत राहणार. राष्ट्रवादी पक्षाच्या बळकटीसाठी काम करणार.’

‘जयंत पाटलांना नोटीस वैगरे काढण्याचा अधिकार नाही…’

‘देश पातळीवर जे नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली देश जो आगेकूच करतोय त्यालाही पाठिंबा देत त्याचा फायदा विकासकामाला होतो. त्यामुळे काल जे काही पत्रकार परिषद घेऊन जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यात आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख असल्यामुळे आणि आता प्रदेशाध्यक्ष या नात्याने कालपासून सुनील तटकरेंची नेमणूक केली असल्यामुळे आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचं करतोय. त्यामुळे 9 लोकांना नोटीस काढली वैगरे.. त्यांना काही नोटीस वैगरे काढण्याचा अधिकार नाही.’

‘शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्याबरोबर आहे असं आमचा ठाम विश्वास आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या बरोबरचे आमदार या सगळ्यांचं भवितव्य व्यवस्थित कशी राहील त्यांना कुठल्याही प्रकारची घटनेची कायद्याची अडचण येणार नाही याबाबतची खबरदारी आम्ही घेत आहोत.’

हे ही वाचा >> Sharad Pawar vs Ajit Pawar : काकांनी भाकरी फिरवली, पुतण्याने तवाच उलटला; असं घडलं राष्ट्रवादीत बंड!

‘काल घटना घडल्यानंतर काही मान्यवरांची अशी प्रतिक्रिया आली की, आम्ही कायदेशीर प्रक्रियेत न जाता जनतेमध्ये जाऊ. परंतु काल रात्रीपासून काही वेगळ्या घटना.. रात्री 12-12 वाजता पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. याला काही अर्थ नाही. आम्ही जी भूमिका घेतली आहे ती योग्य, रास्त चांगली आणि महाराष्ट्रच्या भल्याची आहे.’

‘आम्ही हकालपट्टी करण्याकरिता पक्ष चाललेला नाही. बेरजेचं राजकारण करून आम्ही पक्ष वाढवतो. इथे काय हकालपट्टी करायला बसलोय का? आम्ही म्हणजेच पक्ष आहोत. त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत. आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे हे जे काही सरकार आहे महायुतीचं सरकार आहे ते त्यात चांगलं काम करुन दाखवेल. कोणाला बंड वाटतं कोणाला काय वाटतं.. वाटून चालत नाही.. घटना कायदा याला महत्त्व आहे.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.

    follow whatsapp