Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. जागावाटप आणि उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात आली आहे. असे असताना आगामी 2024 लोकसभा निवडणूक ही चुरशीची होणार आहे. कारण 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणूक पाहिली असता 2019 मध्ये चुरशीच्या लढती वाढल्या होत्या. त्यामुळे सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि पक्षातील फाटाफुट पाहता महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे. (lok sabha election maharashtra 2024 maha vikas aghadi vs mahayuti 2019 2014 election vote share)
ADVERTISEMENT
लोकसभेचा काय लागला होता निकाल?
2014 ची पुनरावृत्ती करत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीने महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विरोधकांच्या पारड्यात फक्त 7 जागा आल्या होत्या. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवणडणुकीचा निकाल एकतर्फी लागला होता.
2014 मध्ये काँग्रेसने 2 जागा जिंकल्या होत्या. मात्र 2019 मध्ये त्यांचा एका जागेवर पराभव झाला होता. त्यामुळे एकाच जागेवर त्यांना समाधान मानावे लागले होते. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी 2014 पासून 4 जागा राखण्यात यश आले होते. AIMIM ने औरंगाबादच्या जागेसाठी VBA सोबत युती केली होती आणि अमरावतीमधून एक अपक्ष उमेदवार उतरवला होता, अशाप्रकारे या आघाडीने दोन जागा जिकंल्या होत्या.
2019 च्या मतदानाची टक्केवारी
2019 च्या निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिली असता, महाराष्ट्रातील 48 पैकी 21 मतदारसंघांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान होते. भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 8 म्हणजेच 16 मतदारसंघ या वर्गवारीत येतात. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तीन मतदार संघ आणि दोन मतदार संघ इतर पक्षाचे आहेत.
महाराष्ट्रातील 48 पैकी 27 मतदारसंघांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होते. भाजप आणि शिवसेनेचे 25 मतदारसंघ येतात. तर आघाडी आणि एमआयएमकडे 1 मतदार संघ येतो.
2014 च्या मतदानाची टक्केवारी
2014 च्या निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिली असता, 16 मतदारसंघांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी मताधिक्य होते. या 16 मतदारसंघांपैकी 11 मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीचे होते. तर काँग्रेस- राष्ट्रवादीचे 5 मतदारसंघ होते.
2014 च्या निवडणुकीत 32 मतदारसंघात 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. यामध्ये भाजप आणि शिवसेना युतीचे 31 मतदारसंघ होते. तर एक मतदारसंघ आघाडीचा होता.
दरम्यान 2014 मध्ये 16 मतदारसंघांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी मताधिक्य होते. हेच मताधिक्य 2019 मध्ये वाढून 21 मतदारसंघापुरते झाले. म्हणजेच 2014च्या तुलनेत 2019 मध्ये 4 मतदार संघ वाढले. त्यामुळे 2019 मध्ये लोकसभा निवडणूक चुरशीची झाल्याचा अंदाज आहे.
मतांची टक्केवारी
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख आपली चमक दाखवली होती. विशेष म्हणजे मुंबई उत्तर, जळगाव आणि ठाणे सारख्या मतदारसंघात युतीने चांगली कामगिरू केली होती. उत्तर मुंबईत त्यांच्या मतांची टक्केवारी 71 टक्क्यांवर पोहोचली होती. अनेक मतदारसंघांपैकी 17 ने युतीचे मत शेअर्स सरासरी ओलांडले आहेत. सर्वच मतदार संघ भाजप-शिवसेना युतीसाठी बालेकिल्ला नव्हती. पण सांगली, परभणी आणि नांदेडसह 24 मतदारसंघात त्यांची मतांची टक्केवारी सरासरीपेक्षा कमी झाली होती. सांगलीत 42.8 टक्के सर्वात कमी मतांची टक्केवारी होती.
तर 1999 ते 2014 या काळात काँग्रेसने महाराष्ट्रावर दीड दशक सत्ता गाजवली. 2014 मध्ये राज्याच्या सत्तेत भाजप आली आणि एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आणि पुढील निवडणुकीपर्यंत पक्षाने पटकन आपली स्थिती मजबूत केली.
2019 च्या निवडणुकीत बारामती आणि सातारा सारख्या भागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पसंती मिळाली. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी अनुक्रमे 52.7 टक्के आणि 52 टक्के मते मिळाली होती. तरीही, विदर्भातील चंद्रपूरमध्ये काँग्रेसला फक्त एकच विजय मिळाला, ज्याचा उमेदवार पूर्वी शिवसेनेशी संबंधित होता. राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रात आपला बालेकिल्ला परत मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु या प्रमुख प्रदेशातून तीन जागा मिळवल्या, जे 2014 च्या तुलनेत मराठ्यांच्या समर्थनात वाढ दर्शवते.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भाजपचा बालेकिल्ला दीर्घकाळ पाठिंबा असलेल्या भागात राहिला. उत्तर महाराष्ट्रात भाजपने 46 टक्क्यांपेक्षा जास्त, तर शिवसेनेने कोकणात 49 टक्क्यांहून अधिक मते मिळविली आहे. या दोघांनी मिळून काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 49 टक्के मते घेतली.
ADVERTISEMENT