Sanjay Raut: महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आज अंतिम बैठक असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (Shivsena), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) लोकसभेच्या जागांचा आज प्रश्न सुटणार आहे. कारण इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत, त्या सर्वांमध्ये कोणताही संभ्रम नसून आज चार वाजता बैठक होणार असून त्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न सुटणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
जय शाह बीसीसीआयवर का?
खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांनी घराणेशाहीवरून केलेल्या टीकेवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह बीसीसीआयवर गेले असते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जागांचा प्रश्न सुटणार
महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागांचा प्रश्न सुटत आला असून आज होणाऱ्या चार वाजताच्या बैठकीत तो तडीला जाणार असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी आज व्यक्त केला.
कोणताही संभ्रम नाही
मविआच्या झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेतेही उपस्थित होते, त्यामुळे सध्या जागा वाटपाबाबत कोणताही संभ्रम नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
आकड्याचं धोरण नाही
महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आज जागा वाटपाबाबत झालेल्या चर्चेमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. जागांबाबत उगाच ओरबडून घ्यायचं आणि जागांचा आकडा वाढवायचं हे आमचं धोरण नाही तर
प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. या बैठकीला पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते.
हुकूमशाहीविरोधात लढायचं
इंडिया आघाडीसह सर्वच पक्षांची राजकीय भूमिका ठरलेली आहे. हुकूमशाहीविरोधात लढायचं असून देशातील लोकशाहीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करायची असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
मशाली गावागावात पेटल्या
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार गटाला तुतारी तर ठाकरे गटाला मशाल मिळाले आहे. सोशळ मीडियाच्या काळात ही चिन्हं लोकांपर्यंत पोहचायला वेळ लागत नाही. त्यामुळे ही चिन्हं लोकांपर्यंत पोहचली आहेत, त्यामुळे मशाली गावागावात पेटल्या आहेत आणि तुतारीही राज्यात पोहचली असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
शाहांना अधिकार नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घराणेशाहीवरून सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली होती. त्यावरूनी खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपला घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही.
कोहलीपेक्षा षटकार लगावले का?
जय शाहांनी विराट कोहलीपेक्षा त्यांनी षटकार लगावले आहेत का? सचिन तेंडूलकरपेक्षा अधिक शतकं ठोकली आहेत की, कपिल देव पेक्षा त्यांनी जास्ट विकेट घेतल्या आहेत, म्हणून त्यांना तुम्ही बीसीसीआयवर बसवला आहात असा खोचक सवाल संजय राऊत यांनी अमित शाह यांना केला आहे.
ADVERTISEMENT