Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राच्या (Maharashtra) दौऱ्यावर असल्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपांवर आता काय निर्णय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज महायुतीची बैठक होणार असल्याने आता अजित पवार गटाला किती जागा मिळणार याकडेही अजित पवार गटासह साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा >>Mahayuti : भाजप 32 जागा, पवारांना 3, तर शिंदेंना फक्त...; शाहांनी काय सांगितलं?
अमित शाह यांच्याबरोबर चर्चा होणार असल्याची शक्यता असतानाच राज्यातील महायुतीची बैठक सुरू असतानाच अजित पवार गटाच्या नेत्यांनी बैठक अर्धवट सोडून त्यांनी अजित पवारांची भेट घेण्यासाठी निघून गेले. त्यानंतर बैठक अर्धवट सोडून नेते का निघून गेले, राष्ट्रवादी गटाला नेमक्या किती जागा मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
बैठक अर्धवट सोडली
महायुतीतील काही नेत्यांबरोबर बैठक चालू असतानाच अजित पवार गटाला 2-3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर अजित पवार गटात खळबळ माजल्याने ती बैठक अर्धवट सोडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांनी बैठक सोडून ते अजित पवारांच्या भेटीला गेल्याचे सांगण्यात आले.
महायुतीच्या जागा वाटपाबाबत अजित पवार गटाला 2-3 जागा मिळण्याची शक्यता महायुतीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच सत्तेमध्ये असलेले अश्वासन पाळा अशी भूमिका अजित पवार गटाने घेतले आहे.
सत्तेमध्ये असताना भाजपने आणि शिंदे गटाने राष्ट्रवादीला दिलेले अश्वासन आता पाळलं जाणार का असाही सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचंही लोकसभेचं गणित आता जागा वाटपावरून आडल्याने महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर साथ देणार की आणखी काही निर्णय घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT