आगामी लोकसभा निवडणूकांसाठी महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका पार पडतायत. महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणूक एकंत्रित लढत असल्याने त्यांच्यात जागा वाटप कसे असणार आहे? याक़डेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मविआतील अनेक पक्षाच्या नेत्यांनी जागावाटपाआधीच त्यांचे आकडे सांगितले होते.त्यात समसमान वाटपाची चर्चा होती. त्यामुळे नेमका महाविकास आघाडीचा (maha vikas aghadi) लोकसभेच्या जागा वाटपासाठी कसा फॉर्म्युला असणार आहे, यावर आता महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मुंबई तक’चे संपादक साहिल जोशी यांच्याशी आजच्या मुद्यात चर्चा केली आहे. नेमका त्यांनी जागा वाटपाबाबत काय फॉर्म्युला सांगितला आहे, हे जाणून घेऊयात. (maha vikas aghadi seat allocation will be in merit based nana patole told on mumbai tak)
ADVERTISEMENT
कॉंग्रेसची भूमिका इतकीच आहे की, जो भाजपविरूद्ध लढायला तयार आहे, त्याला सोबत घेऊन चालायचे. आणि जागावाटपाबाबत बोलायचे झाले तर, जिथे ज्याची मेरीट असेल त्याला जागा मिळालीच पाहिजे. त्यामुळे जी काय मेरीट त्या त्या पक्षाची असेल त्या आधारवरच पुढे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गाला सर्व स्विकारतील असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच जागावाटपाबाबत अद्याप आकडा सांगता येणार नाही. असे जाहीरपणे कोणी सांगूही नये. आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसू, प्रत्येकाचा सर्व्हे बघू, प्रत्येकाची मेरीट बघू आणि त्यानुसार जागावाटपाबाबत निर्णय़ घेऊ असे देखील नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
हे ही वाचा : नऊ तास चौकशी, पण ईडीने पाटलांना कोणते प्रश्न विचारले?
2014, 2019 चा काळ आता बदललाय. कोण याआधी जास्त जागा लढला, त्यापेक्षा कोण जिंकू शकतो ही भूमिका घेणे महत्वाचे आहे. कारण जिंकणे महत्वाचे आहे, असे देखील नाना पटोले म्हणतात. तसेच प्रत्येक पक्षाने त्यांचा सर्व्हे करावा. आम्ही मुंबईत सर्व्हे केला, येथे शिवसेना पहिल्या तर कॉंग्रेस दुसऱ्या स्थानी,असे देखील नाना पटोले म्हणाले.
2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी जी स्वप्न दाखवली होती, त्या स्वप्नांची पुर्तता झालीच नाही. पुलवामाचे संपूर्ण सत्य माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जनतेसमोर उघड केले.त्यामुळे भाजप सगळ्या स्तरावर नापास झाली आहे. ज्या मोदींच्या नावावर हे मते मागतात, ते मोदीच सपशेल फेल ठऱले आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी मोदींवर केली. तसेच 2014 मध्ये मोदींनी जी 56 इंचाची छाती दाखवली होती, ती फोल ठरलीय. जनतेचा भ्रमनिरास झालाय, असे देखील नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
कोण आहे छोटा आणि मोठा भाऊ?
राज्यात सध्या छोटा भाऊ आणि मोठा भाऊची चर्चा आहे. यावर नाना पटोले स्पष्टच उत्तर दिले आहे. आम्ही अनेक वर्ष मोठे राहिलो.देशपातळीवर देखील आम्हीच मोठे आहोत. यामुळे आम्ही गर्व करत नाही. तसेच ते मोठे झाले तरी आम्हाला हरकत नाही. याउलट ही भाषा करण्यापेक्षा भाजपला सत्तेपासून दुर कसे करता येईल, यावर विचार करण्याची गरज आहे, असा सल्ला देखील त्यांनी पक्षांना दिला. तसेच कोणालाही लहान आणि मोठ समजण्याच कारण नाही. छोटा भाऊ मोठा भाऊ या गोष्टी आम्हाला करायच्या नाही आहेत. आम्हाला भाजपला सत्तेपासून दुर करायचे आहे,असे लक्षच नाना पटोले (Nana Patole) यांनी यावेळी मांडले.
ADVERTISEMENT