MVA Lok Sabha 2024 Seats Sharing news : महाराष्ट्रातील ४८ जागासाठी महाविकास आघाडीचा फायनल निर्णय झाला असल्याची माहिती मविआतील सुत्रांनी दिली. कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याबद्दलचा आकडाही समोर आला असून, याबद्दलचा अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. या बैठकीत काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा लढवेल, याबद्दल सूत्र निश्चित झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
महाविकास आघाडी कुणाच्या वाट्याला किती जागा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २१ जागा, काँग्रेसला १५ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ९ जागा असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तर वंचित बहुजन आघाडीला २ जागा आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा सोडली जाणार आहे.
हेही वाचा >> मविआला बसणार झटका, महायुतीचं काय होणार? ओपिनियन पोलचा कौल काय?
जागावाटपाचा हा फॉर्म्युला अजून अंतिम नाही. कारण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये काही लोकसभा मतदारसंघाबद्दल एकमत झालेले नाही. कुठे काँग्रेस-राष्ट्रवादी, तर कुठे काँग्रेस शिवसेना अशी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे यावर तोडगा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काढला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
कसं होणार जागावाटप?
मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकसभा मतदारसंघात ज्या पक्षाचा खासदार आहे, तो त्याला दिला जाणार आहे. त्या पक्षाचा खासदार दुसऱ्या पक्षात गेलेला असला तरी हे सूत्र लागू असणार आहे.
दरम्यान, आणखी एक माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची ४ मार्च रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावाबद्दल चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर यादी निश्चित केली जाणार आहे.
महाविकास आघाडीचं जागावाटप का रखडलं?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीचा सूर जुळत नाहीये. छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसमधून उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस नेते आग्रही आहेत. मात्र शाहू महाराज शिवसेनेतून लढले, तरच जागा सोडणार अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे.
हेही वाचा >> जरांगे पाटलांचा फडणवीसांना पुन्हा इशारा, 'काही झालं तरी मागे हटणार नाही'
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीचा सूर जुळत नाहीये. छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसमधून उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस नेते आग्रही आहेत. मात्र शाहू महाराज शिवसेनेतून लढले, तरच जागा सोडणार अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली, असे समजते.
ADVERTISEMENT