Mahadev Jankar News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. मतदार संघाची चाचपणी सुरु आहे, बैठकांचा धडाका लावला जात आहे. अशात आता आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीला झटका बसण्याची शक्यता आहे. कारण महादेव जानकरांनी राष्ट्रीय समाज पक्षाला ५० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्रात आम्ही २८८ जागा लढणार आहोत,असा इशारा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी वाढणार आहे. (mahadev jankar big statement on vidhan sabha election 2024 warn eknath shinde and devendra fadnavis)
ADVERTISEMENT
सध्या राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा भाग आहे. लोकसभेला मला त्यांनी जागा सोडली होती. पण त्यामध्ये माझा पराजय झाला. ४ लाख ८७ हजार मतदान मला मिळालं. महाराष्ट्रात असं आहे की, मी प्रत्येक वेळेस लोकसभेला लढतो 16 दिवस त्या जिल्ह्यात जातो आणि पावणे पाच लाख मतदान घेतो. हे माझं रेकॉर्ड आहे. पहिल्यांदा नांदेडची जागा लढवली.त्यानंतर सांगली, माढा, बारामती आणि पर्वा परभणी लढलो. त्यामुळे आमची मतांची टक्केवारी वाढतं चाललेली आहे. माझे नगरसेवक आहेत, 4 राज्यात मला टेक्निकली मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्रात माझे 4 आमदार निवडून आले. नगरसेवक आहेत, जिल्हापरिषद सदस्य आहेत. उत्तरप्रदेश मध्येही आमच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. गुजरातमध्ये तीन नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणी विरोधी पक्षनेता राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे, असे महादेव जानकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : BJP : "तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही", भाजपचा ठाकरेंवर हल्ला
महादेव जानकर यांनी परभणीतल्या पराभवाला मुस्लिम मतांना जबाबदार ठरवले आहे. मुस्लिमांनी साथ न दिल्यामुळे पराभव पत्करावा लागला, मात्र विधानसभेला मुस्लिम आपल्याला पुन्हा एकदा साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईमध्ये जागा लढणार
महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला ५० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्रात आम्ही २८८ जागा लढणार आहोत,असा इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे. तसेच मुंबईमध्ये एक नाही तर बऱ्याच जागा लढणार आहे. शिवाजीनगरची जागा लढणार आहे. नेहरूनगर, मानखुर्द अशा दोन चार ठिकाणी आमची तयारी आहे. या मागणीमुळे शिंदे फडणवीसांची डोकेदुखी वाढणार आहे.
हे ही वाचा : Mumbai tak Baithak 2024 Schedule: विधानसभेआधी उडणार धुरळा! ‘मुंबई Tak बैठक’मध्ये 'हे' दिग्गज मांडणार व्हिजन
दरम्यान तुम्ही सांगलीत होणाऱ्या ओबीसी सभेला जाणार का? असा सवाल पत्रकारांनी जानकरांना विचारला होता. यावर जानकर म्हणाले, माझा पक्षच ओबीसींसाठी आहे आणि मी देशभर ओबीसींसाठी काम करतोय. त्यामुळे एखाद्या आंदोलनात मला जायची काही गरज नाही. कोणत्या आंदोलनात गेल्याने आपण ओबीसी नेता नसतो, तर कायम ओबीसींसाठी काम करणं हा माझा हेतू आहे, असे जानकर यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT