Ajit Pawar On Yogi Adityanath : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषेणबाबत मोठी प्रतिक्रिया दिलीय. 'बटेंगे तो कटेंगे' उत्तर प्रदेशात चालू शकतं, पण महाराष्ट्रात हे चालू शकत नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही चिंता कशाला करता? कोणी काहीही बोललं तर त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. मुस्लिमांच्या भावनांना दुखावणार नाही, असं मोठं विधान अजित पवार यांनी केलं आहे. ते बीडमध्ये एका रॅलीत जनतेशी संवाद साधताना बोलत होते.
ADVERTISEMENT
अजित पवार म्हणाले, बटेंगे तो कटेंगे असं नुकतंच कुणीतरी म्हटलं होतं. अशाप्रकारच्या गोष्टी इथे चालणार नाहीत. ते नॉर्थमध्ये होत असेल. पण महाराष्ट्रात अशा गोष्टी अजिबात चालणार नाहीत. महाराष्ट्र साधू संतांचं राज्य आहे. शिवप्रेमींचं राज्य आहे. शाहू-आंबेडकरांचं हे राज्य आहे. त्यांचे विचार आमच्या रक्तात आहेत. म्हणून आम्ही त्याच मार्गावर चालणार आहोत. मुस्लिम समाजाच्या भावनांना दुखावणार नाहीत. माझी विचारधारा शाहू-फुले आंबेडकरांची आहे. जातीपातीचा आम्ही भेदभाव करत नाही. भेदभाव केल्यानं समाजाचं नुकसान होतं.
हे ही वाचा >> Asaduddin Owaisi: "लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले आणि 1900...", असुद्दीन ओवैसी नेमकं काय म्हणाले?
पवार पुढे म्हणाले, मी मुस्लीम समाजाला 10 टक्के जागा माझ्या वाट्यातून दिल्या आहेत. अशा जागा दिल्या नाहीत, जिथे त्यांचा पराभव होईल. ज्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार निवडून येईल, अशा जागा मी दिल्या आहेत. मी नजीबमुल्लांना तिकीट दिलं आहे. नवाब मलिकांना तिकीट दिलं आहे. याला विरोधही झाला. पण मी स्वत: त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. मी सना मलिकांच्या प्रचारासाठीही गेलो होतो. झिशान सिद्दीकी यांनाही आम्ही तिकीट दिलं आहे. आम्ही हसन मुश्रीफ, शेख अशा अनेक कार्यकर्त्यांना तिकीट दिलं आहे.
हे ही वाचा >> Rahul Gandhi : वनवासी नाही, आदिवासी, भारताचे पहिले मालक तेच! नंदुरबारच्या सभेतून मोदींवर निशाणा
योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिल्यानंतर अजित पवारांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, शाहू महाराजांची भूमी आहे. महाराष्ट्रात बाहेरील लोक येतात आणि असं काही बोलतात. दुसऱ्या राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं की त्यांना काय बोलायचं आहे. आम्ही महायुतीत एकत्र काम करत आहोत. पण आमच्या पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. आम्ही सर्व कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार चालवत आहोत, असंही अजित पवार म्हणाले.
ADVERTISEMENT