Mukhyamantri Tirtha Darshan Yojana Latest Update : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत मुस्लिम, जैन, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध धर्मीय तीर्थ स्थळांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या योजनेत अल्पसंख्याकांच्या तीर्थक्षेत्रांना सामील केल्यानं आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला या मतांचा किती फायदा होणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. मुस्लिम धर्मीयांच्या हाजी अली दर्गा, दिवाणशहा दर्गा आणि हाजी मलंग दर्ग्याचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. आमदार रईस शेख यांनी मुख्यमंनत्री शिंदे यांना यासंदर्भात पत्र लिहिलं होतं.
ADVERTISEMENT
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला जाग आली असून अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेवून ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'मध्ये जैन, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध आणि मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र स्थळांचा समावेश करण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या संदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, 14 जुलै रोजी सामाजिक न्याय विभागाने योजना जाहीर केली होती. त्यावेळी राज्यातील 66 आणि देशातील 73 सर्व धर्मीय धार्मिक स्थळांचा समावेश यादीत होता. मात्र राजस्थानचा अजमेर दर्गा वगळता राज्यातील एकाही मुस्लिम धर्मीय स्थळांचा योजनेमध्ये समावेश केला गेला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात मी पत्र लिहिले होते. मुस्लिम धर्मियांची राज्यात 11.50 टक्के लोकसंख्या असताना एकाही दर्गा किंवा मशिदीचा समावेश नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती.
हे ही वाचा >> Shrikant Pangarkar: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदे गटात प्रवेश, 'या' पदावर केली नियुक्ती
त्यानंतर सरकारला जाग आली असून 15 ऑक्टोबर रोजी या योजनेचा सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला, असं आमदार रईस शेख म्हणाले. नव्याने जो शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, त्यामध्ये राज्यातील सर्व धर्मीयांची 95 आणि राज्याबाहेरील सर्व धर्मीयांच्या 15 पवित्र स्थळांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 60 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून प्रत्येक व्यक्तीला तीर्थ दर्शन स्थळाला भेट देण्यासाठी 30 हजार रुपयांचं अनुदान दिलं जात आहे.
15 ऑक्टोबर रोजी महायुती सरकारने जारी केलेल्या सुधारित शासन निर्णयामध्ये 19 व्या क्रमांकावर मुंबईतील हाजी अली दर्गा, भिवंडीतील दिवाण शहा दर्गा आणि ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग दर्गा या तीन मुस्लिम धर्मीय स्थळांचा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. नव्याने सुधारित काढलेला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा काढलेला शासन निर्णय म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेवल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा >> Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात कॉन्स्टेबल सस्पेंड, गोळीबारावेळी फटाक्यांच्या आवाजामुळे...
समावेश करण्यात आलेली तीर्थस्थळे
1.मुस्लिम स्थळे -
हाजी अली दर्गा, माहीम. दिवाणशहा दर्गा, भिवंडी. हाजी मलंग दर्गा, ठाणे.
2.जैन स्थळे -
पलिथाना,भावनगर गुजरात. शंकेश्वर तीर्थ, गुजरात. रामटेक जैन मंदिर, नागपूर.
3.पारशी स्थळे -
इरानशा अताशा बेहराम, नवसारी. कादमी अताशा बेहराम, सुरत. मोदी आकाशा बेहराम, सुरत, गुजरात.
4.बौद्ध स्थळे -
गौतम बुद्धांचे महानिर्वाण, कुशिनगर. गौतम बुद्ध साधनाभूमी, राजगीर. गौतम बुद्ध प्रथम उपदेश ठिकाण, सारनाथ. मुक्तीभूमी येवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव. महाडचे चवदार तळे.
5.ख्रिश्चन स्थळे -
वेलकंनी, कॅथोलिक ख्रिश्चन पवित्र धर्मस्थळ, तामिळनाडू.
15 ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील १९ क्रमांकावर मुस्लिम धर्मियांच्या तीन दर्ग्याचा योजनेत समावेश केल्याचा उल्लेख आहे.
ADVERTISEMENT