Shiv Sena New Song: मुंबई: नवरात्रीच्या मुहूर्तावर ठाकरेंच्या शिवसेनेने एक नवं गाणं आज (3 ऑक्टोबर) लाँच केलं आहे. नवरात्रीची आजपासून सुरुवात होत असल्याने पहिल्याच दिवशी ठाकरेंनी 'मशाल गीत' लाँच केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाने हे गीत लाँच केलं असून त्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. (maharashtra assembly elections shiv sena ubt has launched a new song and targeting the opposition)
ADVERTISEMENT
'असुरांचा संहार कराया मशाल हाती दे..., सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये...' असे या गाण्याचे शब्द आहेत. हे गाणं राज्यातील अराजकतेवर अराजकीय असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
गाणं लाँच केल्यावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'एक गोष्ट लक्षात आली असेल की, गेली दोन-अडीच वर्ष आम्ही न्यायालयाची दारं ठोठावत आहोत. हात दुखायला लागले. न्यायदेवतेवर विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीए.'
'मग आम्ही असं ठरवलं की, शेवटी जगदंबेलाच साकडं घातलं पाहिजे.. आता तू तरी दार उघड बये.. आम्ही आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जात आहोत. मला आत्मविश्वास आहे की, ही सगळी तोतयेगिरी चालली आहे. घटनाबाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करतंय, महिलांवर अत्याचार होत आहेत.'
हे ही वाचा>> Mumbai Tak Chavdi: 'त्या पत्रावर सही केली नाही', चावडीवर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
'मी म्हटलं तसं.. खात्री आहेच.. की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे वेळोवेळी इतिहासात दिसलं आहे. यावेळी देखील ती दाखविल्याशिवाय राहणार नाही.'
'म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की, हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. हे गाणं ऑडिओ, सोशल मीडिया टीमकडून पसरवलं जाईल.'
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana: दादांचा वादा! लाडकी बहीण योजनेबबात मोठी घोषणा, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे पैसे...
'आपण सगळे दसऱ्याला एकत्र भेटणार आहोतच.. पण आता जनतेच्या न्यायालयातील लढाई सुरू झाली आहे. मी सगळ्या राजकीय गोष्टींचा फडशा हा दसऱ्याला शिवाजी पार्कवर पाडेन. त्यामुळे आता कोणाला बोलायचं असेल ते बोलून घेऊ द्या.. दसऱ्याला मी सौ सोनार की एक लोहार की.. करेन.' असं उद्धव ठाकरे हे म्हणाले.
ADVERTISEMENT