Sharad Pawar on Maharashtra Bandh : बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंद विरोधात आज मुंबई हायकोर्टात तातडीने सुनावणी पार पडली. या सुनावणीत महाराष्ट्र बंद वरून कोर्टाने महाविकास आघाडीला फटकारले होते. त्यामुळे कोर्टाने फटकारल्यानंतर शरद पवारांनी ''उद्याचा बंद मागे घ्या'' असे आवाहन केले आहे. यावर ठाकरे काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (maharashtra bandh news update mumbai high court slam maha vikas aghadi sharad pawar appeal withdraw tomorrows bandh)
ADVERTISEMENT
दरम्यान शरद पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उद्याचा बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
शरद पवारांचं ट्विट जसंच्या तसं
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हे ही वाचा : 'आरोपी अक्षय शिंदे मुलींच्या टॉयलेटमध्ये...', बदलापूर प्रकरणाच्या सर्वात धक्कादायक रिपोर्टने खळबळ!
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.
काँग्रेसची भूमिका काय?
राज्यात महिला, तरूणी, बालिका सुरक्षित नाही. म्हणून आम्ही या जनतेचा आक्रोशाला पुढे न्याय मिळावा. त्यांच्या मागणीला यश मिळावं यासाठी हा बंद होता. पण आम्ही कोर्टाच्या आदेशाचा सन्मानच करतो. या संदर्भात पवार साहेबांशी प्रदेशाध्यक्ष बोलतायत. त्यांनतर महाविकास आघाडी एकत्रिक निर्णय जाहीर करेल,असे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Gold Price Today: लयच भारी! आजही घसरल्या सोन्याच्या किंमती; 24 कॅरेटचा भाव काय?
आमचं आताच उद्धव ठाकरे आणि जयंत पाटलांशी बोलण झालं आहे. आम्ही काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून या मुस्कटदाबी सरकारच्या धोरणाविरोधात शांततेत आंदोलन करू. उद्या दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या संबंधित सूचना दिल्या आहेत. कोर्टाच्या निर्णयाला विरोध करायचं कारण नाही पण काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही आंदोलन करू असे नाना पटोले यांनी सांगितले.
दरम्यान उद्धव ठाकरे संध्याकाळी 7 वाजता शिवसेना उबीटीची भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे ठाकरे काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT