तो 'अनलकी बंगला' एकाही मंत्र्याला नको?, रामटेकचा काय आहे इतिहास?

Ramtek Bungalow: Many ministers believe that the government bungalow in Ramtek is unlucky. That's why ministers don't want it. Know why it is said that.

रामटेकचा काय आहे इतिहास?

रामटेकचा काय आहे इतिहास?

पंकजा मुंडे

• 10:13 PM • 25 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

रामटेक बंगल्यावरून वेगळीच चर्चा

point

चंद्रशेखर बावनकुळे रामटेक बंगला नको?

point

पंकजा मुंडे रामटेक बंगला घेणार?

मुंबई: महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्र्यांसाठी बंगल्यांचे नुकतेच वाटप झाले आहे. पण या सगळ्यात मलबार हिल येथे असलेल्या 'रामटेक' बंगल्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या बंगल्याचा ताबा घेण्यास कोणीही तयार नसल्याचं समजतं आहे. कारण अनेक मंत्री हा बंगला 'अनलकी' समजतात. सामान्य प्रशासनाकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यानुसार रामटेक हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत त्यांना देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

पंकजा मुंडे रामटेक बंगल्यात राहण्यास तयार

दरम्यान, बावनकुळे हा बंगला कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी अदलाबदल करण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रामटेक बंगला हा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असून अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आहे. मात्र असं असलं तरीही या बंगल्यात राहणारे मंत्री एकतर भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकतात किंवा पुन्हा मंत्री होऊ शकत नाहीत, असे बोलले जाते.

हे ही वाचा>> Suresh Dhas : "मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रिपद...."; सुरेश धस यांचा मुंडेंना थेट विरोध?

पण सूत्रांच्या माहितीनुसार, पंकजा मुंडे या मात्र 'रामटेक' बंगला घेण्यास तयार आहेत. कारण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना याच बंगल्यात राहत होते. त्यामुळेच या बंगल्याशी पंकजा यांचे भावनिक नाते असल्याचे बोलले जात आहे.

रामटेक बंगल्याचा इतिहास

छगन भुजबळ : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला होता. यावेळी मंत्री असताना तेलगी घोटाळा समोर आला होता. या स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळांवर काही गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

हे ही वाचा>> Sharad Pawar Call Devendra Fadnavis : शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोेलताना म्हणाले...

एकनाथ खडसे : भाजप-शिवसेना 2014 मधील सरकारच्या काळात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला होता. मात्र त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले. यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच त्यानंतर त्यांना आतापर्यंत पुन्हा मंत्री होता आलं नाही.

पुन्हा छगन भुजबळ : 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्या सरकारमध्ये भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मिळाले. पण भुजबळ मंत्री असलेले मविआ सरकार अडीच वर्षांत पडले. त्यामुळे भुजबळांना रामटेक बंगला सोडावा लागलेला.

दीपक केसरकर : मागील महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले दीपक केसरकर यांना हा बंगला मिळाला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असतानाच केसरकर यांना मात्र मंत्रिपद गमवावे लागले आहे. कारण फडणवीस मंत्रिमंडळातून त्यांचे नाव वगळण्यात आले.

पाहा नव्या मंत्र्यांना कोणते बंगले मिळाले

क्र. मंत्री बंगला
1 चंद्रशेखर बावनकुळे  रामटेक
2 नरहरी झिरवाळ सुरुचि - 9 
3 राधाकृष्ण विखे-पाटील रॉयलस्टोन
4 संजय सावकारे अंबर-32
5 हसन मुश्रीफ क - 8 (विशाळगड)
6 संजय शिरसाट अंबर - 38
7 चंद्रकांत पाटील ब - 1 (सिंहगड)
8 प्रताप सरनाईक अवंती - 5
9 गिरीश महाजन सेवासदन
10 भरत गोगावले सुरुचि - 2
11 गुलाबराव पाटील जेतवन
12 गणेश नाईक ब - 4 (पावनगड)
13 मकरंद जाधव सुरुचि - 3
14 दादाजी भुसे ब- 3 (जंजिरा)
15 आकाश फुंडकर यशोधन-1 
16 संजय राठोड शिवनेरी
17 धनंजय मुंडे सातपुडा
18 बाबासाहेब पाटील सुरुचि - 8
19 मंगलप्रभात लोढा ब-5 (विजयदुर्ग)
20 प्रकाश आबिटकर सुरुचि- 15 
21 उदय सामंत मुक्तागिरी
22 माधुरी मिसाळ सुरुचि- 18
23 जयकुमार रावल चित्रकूट
24 मेघना बोर्डीकर सुनिती- 6
25 पंकजा मुंडे पर्णकुटी
26 आशिष जयस्वाल सुनिती- 1
27 अतुल सावे अ-3 (शिवगड)
28 नितेश राणे क -1 (सुवर्णगड)
29 जयकुमार गोरे क - 6 (प्रचितीगड)
30 माणिकराव कोकाटे अंबर-27
31 योगेश कदम सुनिती-10
32 शिवेंद्रराजे भोसले ब-7 (पन्हाळगड)
33 आदिती तटकरे अ-5 (प्रतापड)
34 दत्तात्रय भरणे ब-6 (सिद्धगड)
35 आशिष शेलार ब-2 (रत्नसिंधू)
36 इंद्रनील नाईक सुनिती-9
37 शंभूराज देसाई मेघदूत
38 अशोक ऊईके अ-9 (लोहगड)
39 पकंज भोयर सुनिती- 2
40 राम शिंदे ज्ञानेश्वरी
41 राहुल नार्वेकर शिवगीरी

 

 

    follow whatsapp