शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामागे भाजपच आहे. अजित पवारांना त्याची माहिती नसेल. असं वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. सरकार टिकणार आहे की नाही हे विधानसभेतलं बहुमत ठरवेल, महाविकास आघाडी सरकार सिद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांना त्यांचं बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रात यावंच लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप असेल असं वाटत नाही हे वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांना इथली स्थानिक माहिती आहे, देशातली माहिती मला आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
”अजित पवार यांना इथली स्थानिक माहिती आहे. पण गुजरात आणि आसाम या राज्यांमधली परिस्थिती आम्हाला जास्त माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. हा राष्ट्रीय पक्ष भाजपच आहे. गुजरात आणि आसामला एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची जी व्यवस्था करण्यात आली ती कुणी केली ते मला माहित आहे. ते लोक अजित पवारांच्या परिचायचे असतील असं वाटत नाही” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
“बंडखोर आमदार महाराष्ट्रात येतील तेव्हा…” वाचा काय म्हणाले शरद पवार
शरद पवार म्हणाले की बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास मला वाटतो आहे. विधानसभेत बहुमत चाचणीसाठी त्यांना यावंच लागेल. त्यावेळी देशाला हे समजेल की सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेकदा आली आहे. आत्ताच्या परिस्थितीवर मात करून सरकार कायम राहिल असा विश्वास मला आहे असंही शरद पवार यांनी म्हटल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आली समोर; बैठक संपताच अजित पवारांनी सांगितला पुढचा प्लान
तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जी काही नाराजी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांकडून दाखवली जाते आहे. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. निधी वाटप आणि इतर तक्रारी अकारण केल्या जात आहेत. बंडखोर आमदारांना भविष्यात किंमत मोजावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या परिणामांची भीती वाटत असल्यानेच काँग्रेस राष्ट्रवादीला दोष दिला जातो आहे असंही शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT