Political News of Maharashtra : मविआतील एक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आतापासूनच चाचपणी आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी काम सुरू केले आहे. अलिकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात मंथन झालं. या बैठकीत काही जागांचा आढावाही घेण्यात आला आणि काही पर्यायांवरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार म्हणून निवडून येणाऱ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना राष्ट्रवादी लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचं ठरवलं आहे, पण या नेत्यांनी ‘लोकसभा नको रे बाबा’, असा सूर लावल्याचे समजते. (Latest Update on Maharashtra Politics)
ADVERTISEMENT
राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्याने राजकीय पक्षांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर (Maharashtra political news in Marathi) लक्ष्य केंद्रित केल्याचं दिसत आहे. शिवसेना, शिवसेना (उबाठा), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह इतर पक्षांकडूनही वर्चस्व असलेल्या भागात पक्ष बळकट करण्याचं काम सुरू आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका मविआतील मित्र एकत्र लढणार असले, तरी तिन्ही पक्षांनी आतापासूनच अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा >> ‘ते’ हसणं साक्षीसाठी ठरलं जीवघेणं; साहिलने का केला होता तिघांच्या हत्येचा प्लान?
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवस बैठक झाली. या बैठकीमध्ये 2019 मध्ये लढवलेल्या 22 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकणाऱ्या संभाव्य जागा आणि तिथे कोण उमेदवार द्यायचा, याबद्दल सर्व्हे करण्याबद्दल चर्चा झाली. ज्याला पसंती असेल, त्यालाच तिकीट देण्याबद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली.
Political news of Maharashtra : अनेक वेळा आमदार राहिलेल्यांचा लोकसभा लढवण्यास नकार
या बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवावी अशी चर्चा झाली. मात्र, हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचीच इच्छा व्यक्त केल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांच्या बैठकीत पक्षातील अनेक आमदारांची नावे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून चर्चेत आली. पण, त्या सगळ्यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिल्याचे समजते.
हेही वाचा >> नामांतरावरून असाही गोंधळ! एकाच दिवशी अहमदनगरला मिळाली चार नवी नावं!
2019 मध्ये गुलाबराव पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, यावेळी दरेकर यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे कळते. त्याचबरोबर अनिल पाटील यांनीही जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवल्याचे समजते.
ठाकरे गटासाठी राष्ट्रवादी जागा सोडणार?
राष्ट्रवादीच्या बैठकीत गेल्यावेळी लढवलेल्या 22 जागांबद्दल चर्चा झाली. त्याबरोबर महाविकास आघाडीतून निवडणूक लढवताना राष्ट्रवादीला पूर्वीच्या जागा मिळायला हव्यात अशी भूमिका काही नेत्यांनी मांडल्याचे समजते. पण, 2019 मध्ये राष्ट्रवादीने लढवलेल्या काही जागांवर ठाकरे गटाचे खासदार आहेत. त्या जागांवरून पेच निर्माण होऊ शकतो. मात्र, या जागा सोडण्याची तयारी ठेवावी लागेल, असं शरद पवारांनी बैठकीत सांगितल्याचे समजते.
ADVERTISEMENT