Vidhan Sabha Election: 'पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री', श्रीकांत शिंदेंचा हा कोणता डाव? थेट भाजपलाच...

राहुल गायकवाड

18 Oct 2024 (अपडेटेड: 18 Oct 2024, 11:50 PM)

Vidhan sabha election 2024: विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने मुख्यमंत्री पदासाठी कोणताही अधिकृत चेहरा जाहीर केलेला नसताना श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असं ट्वीट करून नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

श्रीकांत शिंदेंचा हा कोणता डाव?

श्रीकांत शिंदेंचा हा कोणता डाव?

follow google news

बातम्या हायलाइट

point

श्रीकांत शिंदे यांच्या ट्वीटने सर्वांच्या भुवया उंचावल्या

point

'पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री' असं केलं ट्वीट

point

भाजप नेतृत्व नेमकं काय करणार?

Shrikant Shinde Tweet: मुंबई: येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल हे अजून ठरेलंलं नाही. त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. आता शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानेच ट्वीट करत एकनाथ शिंदेंच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नेमकं हे ट्वीट काय आहे आणि शिंदेच का पुन्हा मुख्यमंत्री होणार हे आता सविस्तर जाणून घेऊया. (maharashtra vidhan sabha election 2024 once again eknath shinde is the chief minister shrikant shinde tweet goes viral he trying to warn bjp)

हे वाचलं का?

'पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री', श्रीकांत शिंदेंच्या पोस्टने नव्या चर्चेला उधाण

श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्या व्हिडीओच्या सुरुवातीलाच 'पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री' असं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्याचबरोबर फक्त आश्वासनं नाही तर प्रत्यक्ष कृती अशी कॅप्शन देखील श्रीकांत शिंदे यांनी त्या व्हिडीओला दिली आहे.

हे ही वाचा>> Uddhav Thackeray: 'मशालीचे चटके कुणाला द्यायचे?', अ‍ॅन्जिओप्लास्टीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले

त्या व्हिडीओमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेल्या महिलांचे बाईट घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना पसंती देण्यात येत आहे. पण आता या ट्विटमुळे आता नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

एकीकडे महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा कोणताही अधिकृत चेहरा जाहीर करण्यात आलेला नसताना अचानक एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री असं खुद्द श्रीकांत शिंदे यांच्या ट्विटर हँडलवर झळकल्याने आता महायुतीत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

2022 साली अत्यंत अनपेक्षितपणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून राज्यातील सगळी राजकीय गणितं बदलली. पण असं असलं तरी आतापर्यंत कोणीही असं स्पष्ट म्हणत नव्हतं की, पुढील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील. पण आता स्वत: श्रीकांत शिंदेंनीच तसं म्हटलं आहे.

हे ही वाचा>> Sanjay Raut: 'काय झाडी, काय डोंगर म्हणणाऱ्यांना झाडाच्या मुळाखाली गाडू', ठाकरेंसमोरच राऊतांनी...

महायुतीत कोणाला किती जागा मिळणार याचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. त्यात भाजप सर्वाधिक दीडशे जागा लढवेल असा अंदाज बांधला जात आहे. शाहांनी शिंदेंना त्याग करण्याची आठवण करुन दिल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यास भाजपचा मुख्यमंत्री केला जाईल अशा देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. 

या सगळ्यात आता श्रीकांत शिंदे यांनी थेट व्हिडीओ ट्वीट केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री असं म्हटल्याने भाजपला हा संदेश आहे का? असं देखील बोललं जात आहे. आता भाजपचे नेते यावर काही प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागेल. 

 


 

    follow whatsapp