Manisha Kayande : उद्धव ठाकरेंना झटका, महिला आमदार लवकरच शिंदेंच्या सेनेत!

मुंबई तक

18 Jun 2023 (अपडेटेड: 18 Jun 2023, 07:41 AM)

मनिषा कायंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह मशालही हटवले आहे. त्यांच्या पूर्वीच्या फोटोत मशाल चिन्ह होते.

Shiv sena Ubt MLA manisha kayande will have joined eknath shinde shiv sena

Shiv sena Ubt MLA manisha kayande will have joined eknath shinde shiv sena

follow google news

Manisha Kayande Latest News : परदेश दौऱ्यावरून परतलेल्या उद्धव ठाकरेंना मुंबईत परतताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा झटका दिलाय. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता आणि विधान परिषदेतील आमदार मनिषा कायदे या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे. मनिषा कायंदे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्याबरोबर मुंबईतील तीन नगरसेवक आणि माजी आमदार तुकाराम काटेही शिंदेंच्या सेनेत दाखल होणार आहेत. त्यामुळे शिंदेंकडून ठाकरेंना हा मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या आमदार (विधान परिषद ) मनिषा कायंदे या रविवारी (18 जून) रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा >> सांगली हादरली! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची आठ गोळ्या घालून हत्या

एकीकडे दोन्ही शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. अशातच उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. मनिषा कायंदे यांचा मोबाईल नॉट रिचेबल झाल्याच्या वृत्त समोर आल्यानंतर त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती.

तीन नगरसेवक, एक माजी आमदारही शिवसेनेच्या वाटेवर

मनिषा कायंदे यांच्याबरोबरच मुंबईतील तीन माजी नगरसेवक आणि एक माजी आमदारही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. विजय तांडेल यांच्यासह दोन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनिषा कायंदे या रात्री वर्षा बंगल्या येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.

सोशल मीडियावरून मशाल चिन्ह हटवले

दरम्यान, मनिषा कायंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह मशालही हटवले आहे. त्यांच्या पूर्वीच्या फोटोत मशाल चिन्ह होते.

आमदार मनिषा कायंदे यांचे आधीचे ट्विटर हॅण्डलवरील फोटो.

 

उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतरचा ट्विटर हॅण्डलवरील फोटो.

उपनेते शिशिर शिंदेंनीही सोडली ठाकरेची साथ

2018 मध्ये मनसेतून शिवसेनेत आलेल्या माजी आमदार शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. “गेल्या सहा महिन्यांत आपली भेट होणे देखील अशक्य झाले. आपण कोणाला नकोसे हणे माझ्या संवेदनशील मनाला मुळीच रुचत नाही. माझी घुसमट मीच थांबवतो”, असं शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

हेही वाचा >> सरस्वती वैद्यच्या हत्येचं गूढ उकललं, ‘या’ पदार्थात कीटकनाशक मिसळून हत्या

“माझ्या जीवनातील चार अमूल्य वर्षे ‘फुकट’ गेली अशी माझी धारणा आहे. 30 जून रोजी 2022 रोजी माझी शिवसेना उपनेते म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले, असो”, असा थेट हल्ला शिशिर शिंदेंनी राजीनामा देताना ठाकरेंवर केला आहे. एकापाठोपाठ एक दोन-तीन नेत्यांनी जय महाराष्ट्र केल्याने उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका मानला जात आहे.

    follow whatsapp