Manoj Jarange On Pankaja Munde: गौरव साळी, जालना : ''काहींना टोमणे सहन होत नाही. स्वतः चा स्वार्थ भागला की टोमणे मारतात, त्यांच्यातला मराठा द्वेष जागा होतो, मोठं व्हायचं पण मराठ्यांचे कातडे काढायचे आणि त्यावर मीठ टाकून मजा बघायची'' अशी बोचरी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange)पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर केली आहे. (manoj jarange criticize pankaja munde on maratha reservation jalana rally maharashtra politics)
ADVERTISEMENT
जालन्यात जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक आणि अनेक मुद्यावर भाष्य केले. येत्या 20 ऑगस्ट पर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अहवाल स्वीकारण्यात येणार असल्याचे जरांगेंनी यांवेळी सांगितले आहे. त्याचसोबत काही अतिउत्साही लोक समाज माध्यमांवर उमेदवारी मिळाल्याचं टाकताय, त्यांनी ते टाकणं बंद करावे, असे आवाहन जरांगेनी यावेळी केले आहे.
विधानसभा निवडणुकीबाबत अजून काहीच ठरलेलं नाही. येत्या 29 ऑगस्टला बैठक होईल. या बैठकीत उभं राहायचं की पाडायचं याबाबत समाजाला विचारून निर्णय घेतला जाईल, असे जरांगेंनी सांगितलं आहे. तसेच आतापर्यंत सर्व समाजाचे मिळून 500/ 600 इच्छुकांनी अहवाल सादर केलाय, असे जरांगे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Video : अटल सेतूवर उतरली अन् उडी मारायला गेली, पण...थरारक व्हिडीओ!
जरांगे यांची बीडचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी भेट घेतली होती.या भेटीवर बोलताना जरांगे म्हणाले की, अंतरवाली सराटीत कोणीही येऊ शकतं, त्यात शंका असण्याच काम नाही. तसेच बीडच्या उमेदवारीवर बोलताना जरांगे म्हणाले की, इच्छुक कोणीही असू शकतं, उमेदवारी दिली तर एकालाच देणार, समाजाला तो उमेदवार स्वीकारावा लागेल.
जरांगे पुढे म्हणाले की, ''स्वतः चा एकदा स्वार्थ भागाला की टोमणे मारतात, त्यांच्यातला मराठा द्वेष जागा होतो, मोठं व्हायचं पण मराठ्यांचे कातडे काढायचे आणि त्यावर मीठ टाकून मजा बघायची, अशी टीका जरांगे यांनी नाव न घेता पंकजा मुंडेवर केली.
राज्यात ओबीसी प्रमाणपत्र वाटप करणं बंद झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सूचना कराव्यात, अशी मागणी जरांगेंनी यावेळी केली आहे. तसेच तुम्ही मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही राज्यभरात पुन्हा आंदोलन सुरू करू शकतो, असा इशारा जरागेंनी सरकारला दिला.
ADVERTISEMENT