Eknath Shinde Maratha Reservation and Manoj Jarange: मुंबई: मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) अत्यंत आक्रमकपणे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अखेर शिष्टमंडळाच्या मध्यस्थीनंतर आपलं उपोषण मागे घेतलं. ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तात्काळ मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. पण याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे आता पुन्हा एकदा मोठा संभ्रम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (manoj jarange does not demand overall reservation said cm big confusion after eknath shinde this statement on maratha reservation)
ADVERTISEMENT
‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी नाही..’ असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे मराठा समाजात देखील संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत असं विचारण्यात आलं की..
प्रश्न: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र किंवा सरसकट आरक्षण द्यावं ही जरांगे-पाटील यांची प्रमुख मागणी आहे.
याच प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की…
एकनाथ शिंदे: नाही.. नाही.. तुम्ही आता असं भरकटवू नका. कारण आता त्यांनी जे सांगितलेलं आहे की, ज्यांच्या नोंदी आहेत कुणबी त्यांना तुम्ही तात्काळ युद्ध पातळीवर दाखले देण्याचं काम करा.. आणि याबाबतीत प्रत्येत जिल्ह्यात 10-10 लोक अधिकचे द्या आणि हे काम युद्धपातळीवर पूर्ण करा.. तशा प्रकारचं आश्वासन आमच्या लोकांनी दिलं आहे.
असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
सरसकट आरक्षणावर जरांगे-पाटील काय म्हणाले होते?
दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकार परिषदेआधी मनोज जरांगे पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना देखील सरसकट आरक्षण यावर विचारण्यात आलं.
यावर जरांगे पाटील असं म्हणाले की, ‘सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देणे. फक्त त्यात आपण जे तीन मुद्दे मांडले आहेत. पारंपारिक पूर्वीचा परिवार.. म्हणजे एका परिवारात कितीही असू शकतात. दोन.. रक्ताचे नातेवाईक, संबंधित नातेवाईक आणि रक्ताचे सगेसोयरे.. म्हणजे खाली कोणी राहिलंच नाही.’
‘राहिलं असेल तर आणखी एक शब्द घालतो त्यात.. काही अडचण नाही. यामध्ये जो मागेल त्या गरजवंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र त्या अहवालाच्या आधारे देण्यात येईल असा टाइमबाँड आहे.’ असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत.
असं असताना आता मुख्यमंत्री शिंदेंचं विधान हे विपरित असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता यावर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT