Maratha Reservation : ‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास मुंबई बंद पाडू’, कुणी दिला इशारा

मुंबई तक

• 05:07 PM • 09 Sep 2023

मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ओबीसीवर अन्याय झाल्यास, आम्ही तात्काळ मुंबई बंद पाडू, असा गर्भित इशारा भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी दिला आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सध्या जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सूरू आहे. या आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ओबीसी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. असे असतानाच आता मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ओबीसीवर अन्याय झाल्यास, आम्ही तात्काळ मुंबई बंद पाडू, असा गर्भित इशारा भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. (manoj jarange patil agitation if maratha community get reservation from obc mumbai will be shut down)

हे वाचलं का?

बाळासाहेब सानप म्हणाले की, ओबीसीतूनच आरक्षण मिळावे अशी मराठा समाजाने भूमिका घेतल्याचे दिसते आहे. मात्र सरकारने याबाबत ओबीसीवर अन्याय केला तर ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले.

हे ही वाचा : चंद्राबाबू नायडूंचा 371 कोटी घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय?; CID कडून का झाली कारवाई

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, हे मराठा समाजाने विसरू नये, असे बाळासाहेब सानप यांनी सांगितले. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसीवर अन्याय होईल. मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही, जर असं होत असेल तर आम्ही मुंबई तात्काळ बंद पाडू, असा गर्भित इशाराही सानपांनी दिला आहे.

देशभर आंदोलन छेडणार

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मराठ्यांना ओबीसीमध्ये घेण्यास तीव्र विरोध केला आहे.आमचा मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध आहे. त्यांना ओबीसींमध्ये घेऊ नये. तसेच त्यांना ओबीसींचे प्रमाणपत्रही देऊ नये. नाहीतर आम्ही देशभर आंदोलन छेडू असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला होता. तसेच जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन निर्णय घेतल्यास आम्ही आंदोलन करू. सरकारने दबावात येऊन मराठ्यांना ओबीसींच प्रमाणपत्र दिल्यास आम्ही न्यायालयात जाऊ. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं. ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशाराच बबनराव तायवाडे यांनी सरकारला दिला आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी बंद लिफाफ्यातला जीआर नाकारला, CM शिंदे म्हणाले, ‘सरकारला वेळ…’

 

    follow whatsapp