Manoj Jarange: "आता उपोषण होणार नाही, आता समोरासमोर...", मनोज जरांगेंनी सरकारला दिला इशारा

Manoj Jarange Patil Protest Latest News:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पाच दिवसांपूर्वी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला स्थगिती दिली आहे. मराठा समाजाच्या मागण्या जाहीर करतानाच जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला.

Mumbai Tak

मुंबई तक

30 Jan 2025 (अपडेटेड: 30 Jan 2025, 05:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतलं मागे

point

"मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये..."

point

मनोज जरांगेंनी सरकारला दिला मोठा इशारा, काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Protest Latest News:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पाच दिवसांपूर्वी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला स्थगिती दिली आहे. मराठा समाजाच्या मागण्या जाहीर करतानाच जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये देऊन त्यांना सरकारी नोकरीत घ्या. काही झालं आहे, काही बाकी आहे. आम्हाला सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी पाहिजे, आम्ही थांबत नाही. जर आपल्याला मुंबईला जाताना पोलिसांनी अडवलं, तर आपण मंत्र्याला आणि  मंत्र्याच्या पोराला हाणायचं. यावेळेस मुंबईला जाताना नियोजनबध्दपणे जायचं. मुंबईला धक्का लागता कामा नये. आपण हे उपोषण आता स्थगित करतोय. आता उपोषण होणार नाही..आता समोरासमोर लढाई लढणार"

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

"शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती..घरात बसून राजकीय नेत्यांचे पाय चाटू नका म्हणा विरोधकांना. शिंदे समिती आता लगेच सुरू करायची आहे. बीड आणि धाराशिवमधील दोन अधिकारी आहेत ते नोंदी भेटल्या तरी प्रमाणपत्र देत नाहीत. त्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करा. वंशावळ समिती गठीत करा. मोडी लिपी अभ्यासकाला निधी जास्त देऊन मनुष्यबळ वाढवून द्या. आमच्याकडे काही अभ्यासक आहेत, त्यांना शिंदे समितीने नोंदी सापडण्याचा अधिकार द्यावा. सातारा संस्थान, बॉम्बे गॅझेट, हैदराबाद गॅझेट आणि संस्थांचे गॅझेट घ्या. राज्यातील तरुणांवर दाखल झालेल्या सरसकट केसेस सरकारने मागे घ्याव्यात. आमच्यावर खोट्या केसेस दाखल झाल्या आहेत, त्या केसेस शासनाने मागे घ्याव्यात. आम्हाला एसईबीसी आरक्षण पाहिजे नव्हतं, तर आता ज्या मुलांनी ईडब्ल्यूएसमधून अॅडमिशन घेतलं ते तसचं ठेवा, असं जरांगे म्हणाले.

हे ही वाचा >> 'पेनड्राईव्ह दिल्यापासून 500 लोक कोमात गेलेत..', सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?

जरांगे पुढे म्हणाले,  "मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये देऊन त्यांना सरकारी नोकरीत घ्या. काही झालं आहे, काही बाकी आहे. आम्हाला सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी पाहिजे, आम्ही थांबत नाही. जर आपल्याला मुंबईला जाताना पोलिसांनी अडवलं, तर आपण मंत्र्याला आणि  मंत्र्याच्या पोराला हाणायचं. यावेळेस मुंबईला जाताना नियोजनबध्दपणे जायचं. मुंबईला धक्का लागता कामा नये. आपण हे उपोषण आता स्थगित करतोय. आता उपोषण होणार नाही..आता समोरासमोर लढाई लढणार. सरकार दगा फटका करणार नाही असं वाटतं. जर मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मी मुंबईला जायची तारीख मी जाहीर करणार".

हे ही वाचा >> Sanjay Raut: "दिल्लीत अमित शाहांचा उदय...", उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीनंतर संजय राऊत काय म्हणाले?

मी राज्याच्या मराठा समाजाची बैठक घेऊन मुंबईला जाण्याची तारिख घोषित करेल. मुंबई जाम होऊ शकते.यावेळी मुलं परत येणार नाहीत.तुम्ही सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. आमच्या लेकरांना नख लागू देऊ नका. जर मुंबईत गेलेल्या आमच्या पोरांना जर काही झालं, तर ते आमदार मंत्र्यांच्या पोरांना मारणार.देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. जर फडणवीस यांनी मागण्या पूर्ण केल्या नाही तर बैठक घेऊन मुंबई जाण्याची तारीख जाहीर करू, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

    follow whatsapp