जरांगे पाटलांचा फडणवीसांना पुन्हा इशारा, 'काही झालं तरी मागे हटणार नाही'

मुंबई तक

• 01:53 PM • 29 Feb 2024

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्यामुळे भाजपसह अनेक राजकीय नेत्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली होती. त्यावरूनच आता राजकारण तापले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीसांंनी इशारा देत, 'काही झालं तरी मी आता मागे हटणार नाही' असा इशारा दिला आहे.

manoj jarange patil devendra fadnavis

manoj jarange patil devendra fadnavis

follow google news

बातम्या हायलाइट

point

'मी आता मागे हटणार नाही', जरांगेंचा पुन्हा इशारा

point

आमदार-खासदार फडफड करायला लागलेत

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आल्याने जरांगे पाटील यांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलत पुन्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टार्गेट केले. 

हे वाचलं का?

आत टाकून दाखवा

आता काहीही झाले तरी मागे हटणार नाही नसल्याचे सांगत तुम्ही फक्त आत टाकून दाखवा मग लाट काय असते ते तुम्हाला कळेल असा थेट इशाराही जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. 

 मी मागे हटणार नाही

मनोज जरांगे पाटील यांनी सरकावर जोरदार निशाणा साधताना आता काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही. माझ्यासाठी तुम्ही कोणताही यंत्रणा वापरली तरी आता आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

 उभं आयुष्य पणाला लावलं

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. कारवाईसाठी रात्रीच्या वेळी कारवाया सुरू आहेत, मात्र मी समाजासाठी लढतो आहे. उभं आयुष्य पणाला लावलं असून आम्हाला कायदा कळत नाही असं नाही, त्याच बरोबर सरकार कधी संचारबंदी लावू शकतं हे ही सगळं आम्हाला माहिती असल्याचे सांगितले.

हे ही वाचा >> सोलापूरात अजित पवारांना मोठा धक्का! लोकसभेसाठी भाजपमधून कसणार कंबर

उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जरांगे पाटील यांनी एकेरी भाषेत टीका केली होती. त्यावरूनही त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांसह राजकीय नेत्यांनी निशाणा साधला होता. 

माझी भाषा तशीच

त्यावर स्पष्टीकरण देत, मी ग्रामीण भागात राहिलो आहे, शेतकऱ्याचं पोरगं आहे, त्यामुळे माझी भाषाही तशीच असून फडणवीस यांच्याबरोबर माझं काहीही आणि कोणतंही शत्रूत्व नसल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका मांडली.

मराठा समाजाला अंगावर घेऊ नका

मराठा समाजाविरोधात कोणी टीका केली, मराठा आरक्षणाला विरोध केला गेला. तर आता मी त्याला सोडणार नाही. कारण आता या घडीला मराठा समाजाला कोणीही अंगावर घेऊ नका, कारण आरक्षणाशिवाय आता आमची कोणतीच मागणी नसल्याचे त्यांनी सरकारला सांगितले.

जरांगे पाटील आणि फडणवीस वाद आता टोकाला गेल्याचं दिसून येत आहे. कारण जरांगे पाटलांनी फडणवीसांसह त्यांनी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.

मी शेवटीपर्यंत मराठा आरक्षणासाठी लढत राहणार असलो तरी फडणवीस मात्र त्यांच्या डाव्यात ते शंभर टक्के यशस्वी होतील, आणि त्यामध्ये ते माहीरही आहेत. त्यातच मला अडकवण्यासाठी माझ्याविरोधात अहवाल तयार करण्यात आला आहे. 

आमदार आणि खासदारांनीही कंबर कसली 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आणि केलेल्या टीकेवरून मला गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी मराठा आमदार आणि खासदारांनीही आता कंबर कसली आहे असा जोरदार हल्ला त्यांनी फडणवीसांवर केली आहे.

    follow whatsapp