Maratha Reservation: भारतीय जनता पार्टी जर मराठा आंदोलना विरोधात जर भूमिका घेत असेल तर त्यासाठी सगळ्याच प्रकारची चौकशी केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलनावरून फडणवीस यांच्यावर का टीका केली जाते आहे, त्याचीही सत्ताधाऱ्यांप्रमाणेच आमचीही त्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करावी अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
टीका फक्त फडणवीसांवरच
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांविषयी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली मात्र त्यांनी ना एकनाथ शिंदे यांच्यावर बोलले ना त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यामुळे त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा >> जरांगेंच्या भाषेचं समर्थन मी करणार नाही, पण आंदोलन का चिघळलं?
त्या वक्तव्याची चौकशी करा
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरही टीका केली. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच का टीका केली असा सवाल करून त्यांच्या वक्तव्याचीही चौकशी करण्याची गरज असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केले.
विश्वास फक्त शिंदेंवर
अंबादास दानवे यांनी जरांगे पाटील यांनी केलेली टीका ही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली नाही. मात्र त्यांनी त्यांनी फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर का केली. त्यांनी मुख्यमंत्र्यावर आरोप केले नाहीत. तर जरांगे पाटलांचा फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास वाटतो पण फडणवीस यांच्यावर विश्वास नाही अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
फोनाचीही चौकशी करा
मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन सुरु असताना त्यांना कोण-कोणाचे फोन आले होते, त्यांची काय बोलणं झालं याचीही चौकशी करणे गरजेचे असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ADVERTISEMENT