Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी कायदा हात न घेण्याची सूचना केली. त्यावरून हा मुद्दा पुन्हा एकदा आता पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराच त्यांनी जरांगे पाटलांना दिला. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या त्या इशाऱ्यावर बोलत अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलं अशा शब्दात त्यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
कायदा हातात घेतला तर…
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलनाबरोबरच राजकारण तापले आहे. त्यातच आता जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी मुंबईत येऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावरच आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले की, मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
हे ही वाचा >> ‘त्याची अवस्था कुत्र्यासारखी…’, हिंदुस्थानी भाऊची आव्हाडांवर बोचरी टीका
आम्ही त्यांना मानत नाही
त्यावर बोलताना मनोजर जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले की, शेवटी अजित पवार यांनी पोटातलं ओठावर आणलंच असं म्हणत आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जर कारवाई केली तर मराठा समाजात शांततेत अजित पवारांना उत्तर देण्यात येईल. अजित पवार हे अपघाताने सरकारमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सरकार मानत नाहीत असा टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे.
सहाव्या टप्प्यातील दौरा
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या उपोषणाची घोषणा केल्यानंतर त्यांचा सहाव्या टप्प्यातील दौरा सुरू झाला आहे. आज या दौऱ्याचा चौथा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील दौरा संपवून मनोज जरांगे पाटील आता बीड जिल्ह्यात दाखल झाले असून खामगावमध्ये त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागतही करण्यात आले आहे. आज आणि उद्या मनोज दरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील गोदाकांच्या गावांमध्ये संपर्क दौरा करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना आंदोलनावरून कायदा हातात न घेण्याचे आवाहन केल्यामुळे हा वाद आणखी पेटणार असल्याचे दिसत आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांनीही तेवढ्याच जोरदारपणे त्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
