Manoj Jarange : "माझ्या समाजाची लेकरं संपवू नका, नाहीतर...", मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

मुंबई तक

12 Oct 2024 (अपडेटेड: 12 Oct 2024, 03:19 PM)

Manoj Jarange Patil Speech, Dasara Melava : "या राज्यातल्या सर्व बांधवांना सांगतोय, माझ्या समाजाच्या लेकराला तुमच्यामुळे कलंक लागू देऊ नका आणि माझ्या समाजाच्या लेकराला हारू देऊ नका.

Manoj Jarange Patil Narayangad Speech

Manoj Jarange Patil latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

नारायणगडावर मनोज जरांगेंची तोफ धडाडली

point

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला दिला अल्टिमेटम

point

मनोज जरांगे नारायणगडावर नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Speech, Dasara Melava : "या राज्यातल्या सर्व बांधवांना सांगतोय, माझ्या समाजाच्या लेकराला तुमच्यामुळे कलंक लागू देऊ नका आणि माझ्या समाजाच्या लेकराला हारू देऊ नका. तुम्ही पक्ष-पक्ष करू नका. तुम्ही सारखं नेता-नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका. आपली सोन्यासारखी लेकरं मोठी होण्यासाठी समाज सांभाळा. मला चारही बाजूने घेरलंय. त्याचं कारणही सांगतोय. मी तुमच्यात असो किंवा नसो, पण माझा समाज आणि समाजाची लेकरं संपू देऊ नका. तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाका. दुसऱ्याच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकण्याच्या नादात माझ्या समाजाला कलंक लागू देऊ नका. आरक्षणाची मागणी चौदा महिन्यापासून आहे. एकही मागणी मान्य केली नाही", असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते नारायणगडावर बोलत होते. (Manoj Jarange Patil Gives Warning To Maharashtra Government Over Maratha Reservation Issue)

हे वाचलं का?

दसरा मेळाव्यात जनतेला संबोधीत करताना जरांगे म्हणाले, "निवडून यायचं आणि दुसरीकडे जायचं, मी तसला थोडाच आहे. मी इमानदार माणूस आहे. गरिबांच्या लेकरासाठी गरिबाचाच एक पोरगं लढतोय, त्यांना तेच सहन होत नाही की हे संपेल कधी. मला संपवण्यासाठी अनेक षडयंत्र रचून घाट घातलेत. मला पूर्ण घेरलंय. या गडावरून एक शब्दही खोटं बोलणार नाही. मला सांगावं लागतय, माझा नाईलाज आहे, ज्या गोष्टी मला समाजाला सांगायच्या नाहीत. मला होणाऱ्या वेदना माझा समाज सहन करत नाही. माझा त्रास माझ्या समाजाला सहन होत नाही आणि माझ्या समाजाचा त्रास मला सहन होत नाही. मला होणाऱ्या वेदना मी माझ्या चेहऱ्यावर कधीच आणत नाही. मला जर त्रास झाला, तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतोय. पण माझा नाईलाज आहे".

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: सर्वात मोठी अपडेट! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल? 

मी तुम्हाला सांगितलंय, कलंक लागू द्यायचा नाही. समाज आणि समाजाची लेकंर उच्च ठेवायची. काहीही ठरवलं तरी त्याच भूमिकेवर चालायचं. पण शान, शक्ती आणि बळ हे मात्र समाजाचंच वाढवायचं. 14 महिने झाले, या राज्यात  गोरगरिबांच्या लेकरासाठी उठाव केला आहे. मला आणि इथे जमलेल्या कोट्यावधी लोकांना शब्द पाहिजे आणि उत्तरही पाहिजे. तुम्ही काल परवा मोठ्या 17 जाती आरक्षणात घातल्यात, आता तुम्हाला धक्का लागला नाही का? धक्का लागतो म्हणणारा कुठंय? आमच्यात येऊ नको म्हणणार कुठंय? अरे हा काय दोष आहे? ओबीसीचा इतका द्वेष का? गोर गरिब ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असंही जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारलाही इशारा दिला आहे. "सरकारला सांगतो, ए सरकार...आचारसंहिता लागायच्या आत या राज्यातील सगळ्या जनतेच्या प्रश्नांची अंमलबजावणी करायची. जर नाही केली तर तुम्हाला सगळ्यांना आचारसंहिता लागल्यानंतर जे सांगेन ते करायचं, असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं.

हे ही वाचा >> CCTV Video : सावधान! नवरात्रीत सोनं-चांदी खरेदी करताय? 30 सेकंदात चोराने लुटले लाखोंचे दागिने, कसं ते पाहा

सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही, तर गणित विस्कटून टाकायचं, एकाकी उलटा निर्णय घ्यायचा, असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. तुमची इच्छा जी आहे, मनात जे आहे, ती पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे, असा शब्ददेखील जरांगेंनी शेवटी मराठा समाजाला दिला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने आरक्षण जाहीर करावं, आचारसंहिता लागल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार",असा अल्टिमेटम जरांगेनी सरकारला दिला आहे. 

    follow whatsapp