– इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर
ADVERTISEMENT
Shinde Government Delegation Meet Manoj Jarange Patil, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण मागे घेतले आहे. यानंतर जरांगे पाटलांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. अशात आज सकाळी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत शिष्टमंडळाने राज्य सरकारने काढलेला जीआर जरांगे पाटलांना देण्यात आला. तसेच यावेळी सरकारच्या वतीने जरांगे पाटलांच्या तब्येतीची देखील विचारपूस करण्यात आली. तसेच जरांगेना उपचारा खातर मुंबई हलवण्याबाबतही चर्चा झाली. (maratha reservation shinde government delegation mangesh chiwate atul save meet manoj jarange patil)
मंत्री अतुल सावे, नारायण कुचे आणि मंगेश चिवटे या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची आज रूग्णालयात भेट घेतली. या भेटीत सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांकडे सरकारने काढलेला जीआर सूपूर्द केला. तसचे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी मनोज जरांगे पाटलांना मुंबईत हलवण्याबाबतही चर्चा झाली.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे बद्रीनाथला गेले, पण.. घडलं भलंतच राजकारण!
समाज बांधवांनो, माझी काळजी करू नका. मी ठीक आहे, मुंबई जाण्याची गरज नाही, असे जरांगे पाटलांनी माध्यमांना सांगितले आहे. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती वाढली आहे. हे यश आहे. 24 डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात समिती कुणबी दाखले शोधले पाहिजेत, असे मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी तारखेवरूनही घोळ झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारला 24 डिसेंबरचे वेळ दिल्याचे जरांगे पाटलांचे म्हणणे आहे, तर 2 जानेवारीपर्यंत वेळ दिल्याचा सरकारचा दावा आहे. यावर जरांगे पाटील चांगलेच भडकले होते. जे आहे ते खरं बोलत जा, आणखीण 15 दिवस घ्या पण खोट बोलू नका. मी इतका टोकाचा माणूस आहे. 24 डिसेंबर तारीख त्यांनीच ठरवली आहे. त्यांच्या शब्दाला मान देऊन लगेच हो म्हणलो आहे.
हे ही वाचा : World Cup 2023 : हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर, ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री
आपण सगळे तिकडे होतात. त्यावेळी मनोज जरांगेनी म्हटलं होतं दोन महिन्याची वेळ, आता त्यात काही असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. शेवटी 24 आणि 1 तारखेमध्ये आठवड्याचा फरक आहे, असे अतुल सावे यांनी सांगितले.
हा जीआर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठीचा आहै. हा जीआर पूर्ण महाराष्ट्रासाठीचा आहे. पहिल्यांदा पुर्ण मराठवाड्यासाठी होता. आता लवकरात लवकर समीती काम करेल असे सदिपान भूमरे यांनी सांगितले आहे. तसेच तारखेच्या घोळावर बोलताना भुमरे म्हणाले की, 24 डिसेंबर आणि 2 जानेवारी यामध्ये फार फरक नाही.मला वाटतं की त्या आतपण समितीचं काम पुर्ण होऊ शकतं. पाच सहा दिवसाचा फार मोठा विषय नाही आहे,असे देखील भुमरे म्हणाले आहेत. त्यामुळे आता नेमकी कोणती डेडलाईन समोर येते हे पाहावे लागणार आहे.
ADVERTISEMENT