Maratha Reservation : ”तुम्हीच आमचं गिळलं…”, ‘त्या’ प्रस्तावावर जरांगे भडकले!

प्रशांत गोमाणे

• 05:45 AM • 10 Nov 2023

काही कमी होणार नाही आणि आम्हालाही कमी मिळणार नाही. ओबीसींमध्ये आमच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यानुसार महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आणि ठाम राहू, अशी भूमिका देखील जरांगे पाटलांनी मांडली.

maratha reservation manoj jarange patil manoj jarange patil criticize devendra fadnavis

maratha reservation manoj jarange patil manoj jarange patil criticize devendra fadnavis

follow google news

Manoj Jarange Patil, Maratha Reservation : राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसीतून आरक्षण घेण्याऐवजी स्वतंत्र आरक्षण घ्यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) केले होते. देवेंद्र फडणवीसांच्या या आवाहनावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच भडकले असून त्यांनी ”तुम्हीच आमचं गिळलंय आणि तुम्हाला गिळलेले आम्हाला द्यायचं नाही आहे, अशी टीका केली. तसेच तु्म्ही गिळलेच आता मराठा समाजाने बाहेर काढायचा प्रयत्न सूरू केल्याचेही मनोज जरांगेंनी सांगितले. (maratha reservation manoj jarange patil criticize devendra fadnavis on independent reservation)

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे पाटलांना देवेद्र फडवणीसांच्या त्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला, देवेंद्र फडणवीसांच्या मते मराठा समाजाला ईडब्ल्युएसमध्ये साडे 8 टक्के आरक्षण मिळू शकते,ओबीसीमध्ये साडेतीन टक्के मिळेल. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं तर ते 7 ते साडे 8 टक्के मिळेल. आणि ओबीसीत तुम्हाला फारसा लाभ मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी विचार करायला हवा, असे आवाहन फडणवीसांना केले होते.

हे ही वाचा : भावोजीसाठी बोट कापायला तयार झाला, मांत्रिकाने गळाच…; 22 वर्षीय तरूणासोबत काय घडलं?

यावर जरांगे पाटील म्हणाले, ओबीसीमध्ये लाभ कमी होणार नाही, असे काहीच नाही असे म्हणत त्यांनी फडणवीसांचा प्रस्ताव धुडकारला. तुम्ही पुर्वीपासूनच जे आमचं गिळलंय. ते गिळलेले तुम्हाला द्यायचं नाही आहे, अशी टीका जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केली. तुम्ही गिळलेले आता बाहेर काढायचा प्रयत्न मराठा समाजाने केला आहे. कारण आमच्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.त्यामुळे आम्ही ताकदीने लढवून ते मिळवायचा प्रयत्न करू असे देखील जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

काही कमी होणार नाही आणि आम्हालाही कमी मिळणार नाही. ओबीसींमध्ये आमच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यानुसार महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आणि ठाम राहू, अशी भूमिका देखील जरांगे पाटलांनी मांडली.

    follow whatsapp