Sambhaji Bhide On Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला असतानाच संभाजी भिडे यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना संभाजी भिडेंनी उपोषणादरम्यान पाठिंबा दिला होता. जरांगे यांचे उपोषण शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी दाखवला होता. परंतु, भिडे यांनी आता भूमिका बदलली असून मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं आहे. "मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठलं काढलंय? सिंहांनी सर्व जंगल सांभाळायचं आहे. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. ते त्यांच्या लक्षात येत नाहीय. ते दुर्देव आहे, अशी खंत संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
ADVERTISEMENT
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यावर संभाजी भिडे काय म्हणाले होते?
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला १०० टक्के यश येणार. उपोषणाला लवकरात लवकर यश येण्यासाठी या राजकारणी लोकांकडून पाहिजे तसं करुन घेण्याची जबाबदारी मनोज जरांगे यांनी माझ्यावर टाकली. या लढ्याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे.
हे ही वाचा >> Sambhaji Bhide: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांनी भारतात आश्रय का घेतला? संभाजी भिडेंनी उलगडला 'तो' इतिहास
मनोज जरांगेंनी भिडेंना दिलं प्रत्युत्तर
"जंगल आमचं आहे तर वाघ आरक्षणाची शिकार करेल. हे शब्द देवेंद्र फडणवीसचे आहेत. यांचा झेंडा उचलून कल्याण होत नाही, त्याला आरक्षणच लागतं. देवेंद्र फडणवीस पासून मराठा लांब चालला आहे. आम्ही पण छत्रपतींच्या विचाराचे हिंदूच आहेत. आता हे नवीन अस्त्र काढलं वाटतं. छगन भुजबळला गणिताचं मास्तर करा", असा हल्लाबोल जरांगे यांनी केला
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठलं काढलंय? सिंहांनी सर्व जंगल सांभाळायचं आहे. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवळी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. ते त्यांच्या लक्षात येत नाहीय. ते दुर्देव आहे. मराठा म्हणजे वाघ आणि सिंह, आरक्षण कुठे घेऊन बसलात? असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठून काढलंय? असा सवाल भिडेंनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे यांनी भूमिका बदलली आहे. कारण यापूर्वी भिडेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणाच्या मागणीला जोर लावला होता. परंतु, आता संभाजी भिडे यांनी त्यांच्या भूमिकेतून यू टर्न घेतल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा >> Rakshabandhan: रक्षाबंधनाच्या ओवाळणीसाठी निघाले होते, पण बहिण-भावासोबत रस्त्यातच घडलं भयंकर अन्...
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही केली टीका
संभाजी भिडे हसीना शेख यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत म्हणाले,फणा काढलेल्या नागाच्या आश्रयाला फण्याच्या सावली चांगली पडते म्हणून एखादं बेडूक येत नाही. त्याला कळतं की या नागाच्या फण्याच्या सावलीत आपण यायला नको. त्या दुसरीकडे कुठे गेल्या नाहीत. त्या इथेच आल्या. म्हणजे हिंदूस्थानाच्या आश्रयालाच आल्या. हिंदूंस्थानची संस्कृती ही जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती, देह कष्टवीती उपकारी, अशी वृत्ती असलेला हिंदू समाज असल्यामुळं त्या आल्या आणि त्यांनी आश्रय घेतला. त्या इकडे आल्यानंतर बांगलादेशात प्रतिक्रिया उमटल्या.
ADVERTISEMENT