Prakash Shendge Warns maratha Community : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच आता ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. ज्या तालुक्यातून जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) आंदोलनाची हाक दिली, त्याच तालुक्यातून ओबीसी नेत्यांनी आरक्षण बचावची हाक दिली. त्यातच आज ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी थेट मराठा समाजालाच इशारा दिला आहे. जर तु्म्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. (maratha reservation obc leader prakash shendge warn maratha community manoj jarange patil chhagan bhujbal)
ADVERTISEMENT
जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणाऱ्या ओबीसी समाजाच्या सभेसाठी प्रकाश शेंडगे हे गुरुवारी नांदेडला दाखल झाले होते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ओबीसींची भूमिका घेणारे छगन भुजबळ यांना मतदान करू नये असं अवाहन केलं जातंय. पण तुम्ही एक भुजबळ पाडाल तर महाराष्ट्रात 160 मतदारसंघात ओबीसीं समाज आहे, त्या 160 मतदारसंघात आम्ही 160 आमदारांना पडल्याशिवाय राहणार नाही. आम्हीही कुठे कमी नाही हे दाखवून देऊ असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला.
हे ही वाचा : Uddhav Thackeray: ‘जय भवानी-जय शिवाजी म्हणा अन् मतदान करा’, ठाकरेंनी केलं मोदी-शाहांना टार्गेट
महाराष्ट्रात 60 टक्के ओबीसी समाज आहे. जे कोणी आमच्याविरोधात भूमिका घेतील, मतपेटीची लढाई ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही. जर आमचे आरक्षण गेले तर येणाऱ्या निवडणुकीत कुठलेही सरकार असो, त्याला धडा शिकवल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही, अशीही भूमिका प्रकाश शेंडगे यांनी घेतली.
महाराष्ट्राने अशी आंदोलने पाहिली नाहीत. गावंबदी, जाळपोळ होतं आहे. हे असंच होतं राहिले तर मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत. तसेच राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु आहे.त्यात मारवाडी आणि जैन समाजाच्या नोंदी देखील सापडल्या आहेत. मग त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं का असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT