Mla Disqualification : शिवसेना परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे ‘हा’ आहे पर्याय

प्रशांत गोमाणे

10 Jan 2024 (अपडेटेड: 10 Jan 2024, 03:34 PM)

शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरेंनी धरलेला निर्णय ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून काढू शकत नाही.

mla disqualification case rahul narvekar what option remain udhhav thackeray group eknath shinde maharashtra politics

mla disqualification case rahul narvekar what option remain udhhav thackeray group eknath shinde maharashtra politics

follow google news

आमदार अपात्रता निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ‘शिंदे गटच खरी शिवसेना’ अशी मान्यता दिली आहे. यासोबत एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनाही अध्यक्षांनी पात्र ठरवले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच (Eknath Shinde) राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत. संविधान, कायदा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा नार्वेकर यांनी केला होता. नार्वेकरांच्या या निकालानंतर ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. तसेच आमदार अपात्रतेच्या निकालानंतर आता ठाकरेंसमोर नेमका कोणता मार्ग उरला आहे? हे जाणून घेऊयात. (mla disqualification case rahul narvekar what option remain udhhav thackeray group eknath shinde maharashtra politics)

हे वाचलं का?

निवडणूक आयोगाने याआधीच शिंदे गटाला खरी शिवसेना असल्याची मान्यता दिली. यासोबत त्यांना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह देखील दिले होते. या निकालाच ठाकरेंना आधीच धक्का बसला होता. त्यात आता विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतरही ठाकरेंच्या पदरी निराशाच पडली आहे. या निकालामुळे आता ठाकरे गट फुटण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे अनेक आमदार त्यांची साथ सोडणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकंच नाही तर आता निवडणूक आयोगासमोर उद्धव ठाकरेंना स्वत:ला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

हे ही वाचा : Shiv Sena: ‘गुजरात लॉबीचं स्वप्न.. नार्वेकरांनी खंजीर खुपसला..’, निकालानंतर संजय राऊतांच्या संतापाचा कडेलोट

या निकालानंतर आता उद्धव ठाकरे गटासमोर सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय आहे. निकालाआधीच ठाकरे म्हणाले होते की, विधानसभा अध्यक्षांचा निकाल जर आमच्या बाजूने लागला नाही तर सुप्रीम कोर्टात धाव घेऊ आणि नार्वेकरांच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. त्यामुळे आता ठाकरे गट नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू शकतात. या प्रकरणात सर्वोच्य न्यायालय काय निकाल देईल? ठाकरेंना या निकालाचा किती फायदा होईल? हे येणाऱ्या काळात कळणार आहे.

नार्वेकरांनी काय दिला निकाल?

निकाल वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, आम्ही शिवसेनेची घटना वाचली आहे. खरी शिवसेना कोण हा खरा मुद्दा होता.सुप्रीम कोर्टाच्य़ा निकालाचाही त्यांनी उल्लेख केला. आमदार अपात्रतेचा निकाल हा विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात. शिवसेमेच्या 1999 मध्ये झालेल्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, माझे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. मी निवडणूक आयोगाच्या नोंदीच्या पलिकडे जाऊ शकत नाही.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : “…मग आम्हाला अपात्र का केलं नाही?”, ठाकरेंचा नार्वेकरांना संतप्त सवाल

शिवसेनेची 2018 ची सुधारीत घटना वैध मानता येणार नाही. निवडणूक आयोगातही याची नोंद नाही आहे. रेकॉर्डनुसार मी शिवसेना पक्षाची 1999 ची घटना वैध घटना म्हणून विचारात घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरेंनी धरलेला निर्णय ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून काढू शकत नाही, असं झालं तर पक्षातला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही, पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक असल्याचेही नार्वेकरांनी निकालात म्हटले आहे.

    follow whatsapp