MLA Geeta jain Slaps Engineer : मिरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी महापालिकेच्या अभियंत्याला कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभियंता आणि अधिकारी परीसरात तोडक कारवाई करण्यास आले होते. यावेळी गीता जैन यांनी जाब विचारताना महापालिकेच्या अभियंत्याचा कॉलर पकडून त्याला कानशिलात लगावल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत. दरम्यान या सर्व घटनाक्रमानंतर आता आमदार जैन यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. (mla geeta jain slaps engineer mira bhaynader mahanagar palika video viral social media)
ADVERTISEMENT
प्रकरण काय?
मिरा-भाईंदरच्या पेंडकर पाडा परिसरात महापालिकेचा अभियंता आणि कर्मचारी तोडक कारवाई करण्यास आले होते. ही तोडक कारवाई रोखण्यासाठी पिडित कुटुंबियांनी आमदार गीता जैन यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. गीता जैन यांनी यावेळी कुटूंबियांच्यावतीने अभियंता आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. हा जाब विचारत असताना महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणारा अभियंता शुभम पाटीलला हसू आले, असे गीता जैन यांचे म्हणणे आहे. अभियंत्याच्या याच कृतीला रागावून गीता जैन यांनी अभियंत्याचा शर्ट पकडून कॉलर धरली आणि त्याच्या कानशिलात लगावली होती. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली होती. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : ‘देवेंद्र फडणवीस सध्या ‘नावडाबाई’ झालेत…’, उद्धव ठाकरेंनी काढली खपली!
गीता जैन यांचे स्पष्टीकरण?
दरम्यान घडलेल्या या सर्व प्रकारावर आता गीता जैन यांचे स्पष्टीकरण दिले आहे. पेंडकर पाड्यात 45 वर्षापासून एक कुटुंब राहत आहे. या कुटुंबियांचे घर अनधिकृत नव्हतेच, फक्त त्यांनी बाथरूमचा भाग वाढवला होता, याबाबतची कबुलीही त्यांनी दिली होती. तसेच पीडित कुटूंबियांनी आम्ही स्वत: तो भाग तोडून देतो, जेसीबी आणलात तर माझे पुर्ण घर तुटणार आहे, अशी विनंती केली होती. मात्र तरी देखील अधिकाऱ्यांनी जाऊन तोडक कारवाई केली होती,अशे गीता जैन यांनी म्हटले आहे.
या कारवाईचा जाब विचारण्यासाठी मी तिथे पोहोचले होते. मी सांगितले आपले जीआर आहे. पावसाळ्यात आपण घर तोडू शकत नाही, ते अधिकृत असो किंवा अनधिकृत. आणि याचे घर अधिकृत आहे. यावेळी महिला आणि तिचे 6 महिन्यांचे मुलं दाखवून माझ्यासमोर रडत होती.तेव्हा तो अधिकारी हसत होता. त्यामुळे त्याच्यावर राग आला आणि माझा हात उठला, असे गीता जैन म्हणाल्या आहेत. तसेच कायद्याचा जो भंग झाला त्याबद्दल जे काही शिक्षा असेल ती मी भोगायला तयार आहे. पण एखाद्या महिलेचा इतका अपमान मी सहन करू शकत नाही, असे देखील गीता जैन म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT