Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटलांच्या आरक्षणामुळे (Maratha Reservation) तापलेला आहे. त्यातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. त्यामुळे सरकार आणि छगन भुजबळ असा आता वाद रंगल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या भुमिकेमुळेच आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikawad) यांनी त्यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीकी केली आहे. ‘ते मराठा समाजाविरोधात भूमिका घेत असतील तर त्यांच्या कंबरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा’ अशा शब्दात शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
शिंदे गटाची नाराजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढल्यानंतर मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा वाद टोकाला गेला. त्यातच भुजबळ यांनी थेट आव्हान देत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतली. त्यामुळेच आता शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करत भुजबळांवर टीका केली जात आहे.
हे ही वाचा >> ‘Love मॅरेज करणाऱ्यांना कुणबी आरक्षण कसं?’, मनोज जरांगेंचं उत्तर ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल!
कंबरेत लाथ घालून…
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्या मंत्री पदाची शपथ घेताना काय शपथ घेतली होती याचीही त्यांना आठवण करून दिली आहे.आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, ‘भुजबळ मराठा समाजाविरोधात भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, कंबरेत लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा.
लायकी नाही
‘एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका एका धर्माविरोधात आणि समाजाविरोधात असू शकत नाही. तो त्या मंत्रिपदावर राहण्याच्या लायकीचा नाही. त्यामुळे ताबोडतोब या भुजबळाला घरचा रस्ता दाखवा.’ अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.’
राष्ट्रववादीलाही अशी भाषा येते
छगन भुजबळांवर टीका केल्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. अमोल मिटकरींनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गायकवाड जर लाथ घालायची भाषा करत असतील तर त्याच्याही पुढची भाषा राष्ट्रवादीही करू शकते असा पलटवार त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT