-जका खान, बुलढाणा
ADVERTISEMENT
Sanjay Gaikwad News : ‘मी त्याच्या नरडीचा घोट घेईन. मी त्याला फाडून खाईन’, हे धक्कादायक विधान केलं आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी. बुलढाण्याचे आमदार असलेल्या गायकवाडांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हा इशारा दिला. इतकंच नाही, तर मागच्या सरकारमुळे मराठा आरक्षण रद्द झालं, असं म्हणत गायकवाडांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारवर यांचं खापर फोडलं. (Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Said, If Anyone Goes against Maratha Reservation, I will kill him)
आमदार गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात कुणी मधे येत असेल तर तुमची काय भूमिका असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
हे ही वाचा >> ‘हल्ला झाला तेव्हा माझी पत्नी, मुलं…’, संदीप क्षीरसागरांनी सांगितलं हल्लेखोर कोण?
त्यावर बोलताना आमदार गायकवाड म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षणासाठी मागच्या 43 वर्षांपासून खूप हिणवलं गेलं. त्याची चेष्टा केली गेली. मस्करी केली गेली. अतिशय शांततेने त्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. पण, आता या गोष्टीचा उद्रेक होत चालला आहे.”
Maratha Reservation : महाविकास आघाडीवर फोडलं खापर
“मागच्या कार्यकाळामध्ये काही राज्यकर्ता लोकांमुळे मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या सुप्रीम कोर्टासमोर येऊ दिल्या गेल्या नाही. वकिलांना बोलू दिलं गेलं नाही. आणि म्हणून हायकोर्टात जे आरक्षण टिकलं, ते सुप्रीम कोर्टात गमवावं लागलं”, असं म्हणत संजय गायकवाडांनी महाविकास आघाडी सरकारवर मराठा आरक्षण रद्द होण्याचं खापर फोडलं.
हे ही वाचा >> Maratha Reservation : शिंदेंनी ठाकरेंना डावललं! राऊत संतापले; म्हणाले, “हिशोबाची वेळ…”
मी त्याचा जीव घेईन… आमदार गायकवाड काय बोलले?
“यापुढे कुणी मिळालेल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये… हे आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न जर कुणी केला, तर… जो कुणी असेल, मी त्याच्या नरडीचा घोट घेईन. त्याला फाडून खाईन. त्याचा जीव घेईन. त्याला सळो की पळो मी करून टाकेन. कुणीही कुणाच्या आर्थिक जीवनाशी खेळू नये. अनेकांचे जीव या आरक्षणापायी गेले आहेत. आता कुणाचा जीव जाणार नाही, तर जो आडवा येईल, त्याचा आम्ही जीव घेऊ”, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला.
ADVERTISEMENT