Raj Thackeray Tweet: "...म्हणून बदलापूरच्या आक्रोशाला तोंड फुटलं"; राज ठाकरेंच्या ट्वीटनं खळबळ

मुंबई तक

21 Aug 2024 (अपडेटेड: 21 Aug 2024, 06:34 PM)

Raj Thackeray Tweet On Badlapur Incident : बदलापूरच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळं सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात उसळेल्या हिंसाचारामुळं सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

Raj Thackeray Tweet On Badlapur Crime

Raj Thackeray Tweet On Badlapur Crime

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंनी ट्वीटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला हल्लाबोल

point

लाडकी बहीण योजनेवरही राज ठाकरेंचा निशाणा

point

बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray Tweet On Badlapur Incident : बदलापूरच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळं सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात उसळेल्या हिंसाचारामुळं सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. "या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही, असं राज ठाकरेंनी ट्वीटरवर म्हटलं आहे.

हे वाचलं का?

राज ठाकरेंनी ट्वीटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला हल्लाबोल

"बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. 
मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. 

हे ही वाचा >> Maharashtra Bandh : 'या' तारखेला महाराष्ट्र बंद! मविआचा मोठा निर्णय

लाडकी बहीण योजनेवरही राज ठाकरेंचा निशाणा

आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे." असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. 

हे ही वाचा >> Badlapur News: आता वामन म्हात्रे म्हणतात, 'त्यांना बदलापूरमध्ये दंगल घडवायची होती'

"बदलापूरचं आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं. फटाफट आंदोलन होतं तिथे स्थानिक लोक असतात. इथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते. इतर ठिकाणाहून गाड्या भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते. मंत्री महोदयांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तरीही लोक हटायचं नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. छोट्या मुलीची दुर्देवी घटना घडली, त्याचं राजकारण करता. ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. कुठे असे आंदोलन असतात का?" असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला होता.

    follow whatsapp