Raj Thackeray: "...म्हणून मुंबई महानगरपालिकेवर खूप ताण", आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray On BMC : "मी आयुक्तांच्या कानावर दोन विषय घातले. मुंबई शहरातील जमिनिखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत, मग त्या रिलायन्स, अदाणीच्या असतील किंवा इतर ज्या काही आहेत..आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती चांगली नाही".

राज ठाकरे मनसे

राज ठाकरे, मनसे

मुंबई तक

• 03:18 PM • 21 Feb 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंनी मनपा आयुक्तांसोबत कोणत्या विषयावर चर्चा केली?

point

"मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती..."

point

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray On BMC : "मी आयुक्तांच्या कानावर दोन विषय घातले. मुंबई शहरातील जमिनिखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत, मग त्या रिलायन्स, अदाणीच्या असतील किंवा इतर ज्या काही आहेत..आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून येणारे जे पैसे आहेत, ते महानगरपालिका का घेत नाहीय? त्यांनी असं सांगितलं की ते आता राज्य सरकारने निर्णय केलेला आहे. परंतु, मला असं वाटतं की आता आयुक्तांकडून राज्य सरकारला त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत, ते हलवू नयेत. अशी आमची इच्छा आहे. एकतर जीएसटीमुळे ऑक्ट्रॉय बंद झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेवर खूप ताण आहे", अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. राज ठाकरे यांनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

हे वाचलं का?

राज ठाकरे पुढे म्हणाले, "महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स हा दुसरा विषय होता. मुंबई, महाराष्ट्रातून येणाऱ्या पेशंटचा विषय नाहीय. परंतु, परराज्यातून येणाऱ्या पेशंटचा जो विषय आहे, तो इतका लोड या महानगरपालिकेंच्या हॉस्पिटलवर येतो आणि त्यानंतर सर्व परिस्थिती बिघडते. मुंबई महानगरपालिकेला या सर्व गोष्टींचं ओझं वाहावं लागतंय. इतर राज्यातील पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाहीय. पण इतर राज्यातील जे पेशंट आहेत, तिकडच्या महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेला पैसे देत आहेत का? की नुसतेच आपण पेशंट बघायचेत आणि आपल्या शहरावरचा किंवा हॉस्पिटलचा लोड  वाढवायचाय? या दृष्टीकोनातून वेगळे चार्जेस करता येतील का, कसे करता येतील? यावर आमचं बोलणं झालं".

हे ही वाचा >> Manikrao Kokate यांची आमदारकी रद्द कधी करणार? 'त्या' प्रकरणाचा उल्लेख, विधानसभा अध्यक्षांना सवाल

"जर तुम्ही कचरा संकलनासाठी करत लावताय, मग आज ज्या झोपडपट्ट्या आहेत. अनधिकृत कमर्शियल जागा पण आहे. तिथे पण तुम्ही कर लावताय. मग महानगरपालिकेच्या जमिनीखालून जाणाऱ्या 42 युटिलिटी आहेत, त्यापैकी किती लोकांकडून आपण कर वसूल करतो. मग त्या रिलायन्स, एअरटेल, कोणाच्याही युटिलिटी असतील, त्यांच्याकडून जर कर वसूल केला गेला तर जवळ जवळ 8 ते 10 हजार कोटींचं उत्पन्न हे महानगर पालिकेला मिळू शकतं. महानगर पालिकेने त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत", असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

हे ही वाचा >> Chhaava Movie 7th Day Collection : आठवडा उलटला, रेकॉर्डवर रेकॉर्ड मोडत निघालाय 'छावा', आतापर्यंत किती कमावले

    follow whatsapp